bjp evm esakal
देश

EVM: कोणतंही बटन दाबा, जिंकेल तर कमळच; चक्क भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

BJP MP D Arwind controversy on election evm

हैद्राबाद- देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात हालचाल पाहायला मिळत आहे. तेलंगणातील भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे. भाजप खासदार डी. अरविंद यांनी म्हटलं की, कोणालाही मत द्या, पण ते मत भाजपलाच मिळेल, असं ते म्हणाले.

भाजप खासदाराच्या वक्तव्यावर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) आक्षेप घेतला असून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. बीआरएसने ईव्हीएम मशिनवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. बीआरएसने अरविंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

निजामाबादचे खासदार असलेले डी. अरविंद म्हणाले होते की, लोक कोणत्याही पक्षाला मतदान करो, काँग्रेस किंवा नोटाला मतदान देतील. कोणतंही बटण दाबले तरी, आमचाच विजय होईल. काँग्रेसला मत दिलात तरी कमळच जिंकेल. डी. अरविंद एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी तक्रार दाखल करत म्हटलंय की, 'अरविंद यांचा इरादा स्पष्ट होत आहे. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर बटन दाबले तर भाजपला मतदान जाईल. ईव्हीएममधील घोटाळ्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणात गंभीरतेने चौकशी व्हायला हवी.' खासदार डी. अरविंद यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

डी. अरविंद काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर मी उत्तर दिले होते. मी म्हटलं होतं की, नोटा, काँग्रेस किंवा बीआरएसचे कोणतेही बटन दाबले, तरी माझ्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे मी निश्चितच जिंकेन, असं ते म्हणाले. देशात ईव्हीएम घोटाळ्यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम मशिनवर आक्षेप घेतला जातो. आता डी. अरविंद यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाला आयते कोलित मिळाले आहे. त्यामुळे राज्यात या मुद्द्यावरुन राजकारण तापवले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT