Telangana
Telangana esakal
देश

Telangana : या घरातले लोक जेवतात तेलंगनात आणि झोपतात महाराष्ट्रात!

सकाळ डिजिटल टीम

कधीतरी एखाद्या शेताच्या बांधावरून तूम्ही लहानपणी तळ्यात मळ्यात खेळ खेळला असाल. पण, आपल्या राज्यात एक असं कुटुंब आहे ज्यांच्या घरातून महाराष्ट्र आणि तेलंगनाची सिमा आहे. त्यामूळे या घराचा अर्धा भाग तेलंगणात तर अर्धा भाग महाराष्ट्रात आहे.

चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्यात येणाऱ्या महाराजगुडा इथे हे घर आहे. या घरातील स्वयंपाक घर तेलंगनात, तर बैठक खोली महाराष्ट्रात आहे. ऐकून नवल वाटलं ना?..पण हे खरं आहे.

जिवती तालुक्यातील १४ गावे सीमा वादात आहेत. या गावांवर महाराष्ट्र आणि तेलंगना सरकार आपला अधिकार सांगतात. त्यापैकी एक असलेले महाराजगुडा हे गाव आहे. या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती,शाळा, कल्याणकारी योजना, अंगणवाडी आणि रुग्णालये आहेत. इतकेच नाही तर या ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान देखील करतात.

या घरात १० खोल्या आहेत. त्यापैकी काही खोल्या बैठकीच्या आणि किचनसाठी चार खोल्या आहेत. अशात यातील स्वयंपाक घराच्या खोल्या महाराष्ट्रात गेल्या आहेत. तर बैठक खोल्या तेलंगनात आहेत. त्यामुळे तेलंगणात जेवण बनवायचे आणि महाराष्ट्रातल्या बैठकीच्या खोलीत रहायचे अशी नवलाई पाहून सगळीकडे या घराची चर्चा सुरू आहे.

या गावावर तेलंगना सरकारने आपला हक्क सांगितला आहे. तेलंगणा राज्याची सीमा निश्चित केली जात आहे. यात सीमा गावाच्या मधोमध आहे. त्यामुळे गावाची विभागणी दोन राज्यांमध्ये झाली आहे. ही सीमा गावाचा मध्यभागातून गेली आहे. त्यामुळं गाव दोन राज्यात विभागले गेले आहे. अर्ध गाव महाराष्ट्रात तर अर्ध गाव तेलंगनात आहे.

तेलंगणातील अजब घर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT