Temple Found Under Mosque e sakal
देश

कर्नाटकात मशिदीत सापडली मंदिरासारखी रचना

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात ज्ञानवापी मशिदीचा वाद (Gyanvapi Mosque Row) सुरू आहे. त्यातच कर्नाटकातील मंगळुरूच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरांसारखी स्थापत्य रचना सापडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.

मंगळुरूमधील गुरुप्रा तालुक्यातील मलाल मार्केट परिसरात ही मशीद आहे. या मशिदीच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यावेळी इथं एक हिंदू मंदिरासारखी स्थापत्य रचना आढळून आली. मशीद बांधण्यापूर्वी मंदिर अस्तित्वात होते, असा दावा विश्व हिंदू परिषदेने केला असून कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत नूतनीकरणाचे काम थांबवावे असे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे. पण, जिल्हा प्रशासनाने शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ज्ञानवापी मशिदीवरून वाद चिघळला आहे. याठिकाणी मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. तर मुस्लीम समुदायाने प्रार्थनास्थळांसंबंधीत कायद्याचा उल्लेख केला आहे. कोणत्याही प्रार्थनास्थळांचे दुसऱ्या प्रार्थनास्थळांमध्ये रुपांतर करू नये, असा हा कायदा होता. पण, वाराणसी न्यायालयाने मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश या कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप मुस्लीम संघटनांनी केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील पोहोचलं होतं. त्यानंतर न्यायालयाने परत हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment Success : जिद्द असेल तर आकाशही ठेंगणं! सोलापूरच्या ग्रामीण भागातील लेक बनली पोलिस; गरिबीतल्या संघर्षाची ही गोष्ट वाचून डोळे पाणावतील

Tea Price Hike : चहा महागला! युद्धाचा फटका थेट चहावर; प्रति कप ₹1 दरवाढ

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये अंबप रोडवर भीषण आग; शेती आणि झाडांना मोठा फटका

IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा

SCROLL FOR NEXT