Odisha Devgarh esakal
देश

अंधश्रद्धेचा कळस! भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी 6 वर्षाच्या मुलाचा दिला जात होता बळी, तितक्यात..

'भगवान शिवानं महिलेला स्वप्नात येऊन सांगितलं की, मी एक मंदिरातच प्रकट होईन आणि तुला दर्शन देईन.'

सकाळ डिजिटल टीम

'भगवान शिवानं महिलेला स्वप्नात येऊन सांगितलं की, मी एक मंदिरातच प्रकट होईन आणि तुला दर्शन देईन.'

ओडिशातील देवगड जिल्ह्यात (Odisha Devgarh) एका 6 वर्षाच्या मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंदिराच्या पुजाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आलीय. हे लोक भगवान शंकराला (Lord Shankar) प्रसन्न करण्यासाठी एका निष्पाप बालकाचा बळी देणार होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'सध्या आम्ही निरंजन बेहरा नावाच्या व्यक्तीला अटक केलीय, जो 6 वर्षांच्या मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न करत होता. मुलाला जिवंत गाडण्यासाठी तीन फूट खोल खड्डाही खणण्यात आला होता.' पोलिसांनी (Police) मंदिराचा पुजारी त्रिनाथ बेहरा यालाही अटक केलीय. या पुजार्‍यानं निरंजनला यज्ञ करण्याचा सल्ला दिला आणि तो त्याला या कामात मदतही करत होता, असा आरोप आहे.

Devgarh Police

देवगड पोलिस (Devgarh Police) स्टेशनचे प्रभारी सुरेंद्र नायक यांनी सांगितलं की, बनिता बेहरा नावाच्या महिलेनं दावा केलाय, काही महिन्यांपासून तिच्या स्वप्नात भगवान शिव दिसत आहेत. भगवान शिवानं तिला स्वप्नात येऊन सांगितलं की, 'मी एक मंदिरातच प्रकट होईन आणि तुला दर्शन देईन.' देवाच्या दर्शनासाठी बनितानं पती निरंजनसह गावाजवळील झाडाची पूजा सुरू केली. भगवान शिव आपल्याला इथं दर्शन देतील, असं तिला वाटू लागलं. बराच काळ पूजा करूनही काही झालं नाही, तेव्हा तिनं मंदिराच्या पुजाऱ्याची भेट घेतली. पुजारी त्रिनाथ यांनी पती-पत्नीला सांगितलं की, 'जर त्यांना परमेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांना मानवी बळी द्यावा लागेल.'

मानवी बळी देण्याच्या उद्देशानं निरंजन आणि मंदिराच्या पुजार्‍यानं शनिवारी गावातून एका 6 वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं. ते दोघंही त्यांनी खोदलेल्या खड्ड्यात मुलाला पुरण्यासाठी जात होते. मात्र, ते त्याला दफन करण्याआधीच मुलानं आरडाओरडा करून तेथून पळ काढला. मुलानं धावत घरी जाऊन सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यावर ग्रामस्थ झाडाजवळ पोहोचले असता, निरंजन आणि मंदिराचा पुजारी काळी जादू करत असल्याचं दिसलं. गावकऱ्यांनी जवळच खोदलेला खड्डाही पाहिला आणि पोलिसांना कळवलं. पोलिसांनी पुजारी आणि निरंजनला मानवी बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : पुणे तापमानात होतयं उणे, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; ४ दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Sangli Crime : सांगलीत चाललंय काय? जतमध्ये नग्नावस्थेत तोंड, डोके ठेचून तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात गंभीर जखमा

Latest Marathi News Live Update : राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी आज मतदान; कर्मचारी पोहोचले मतदान केंद्रांवर

Air Pollution : वाकड, रावेतला प्रदूषणाचा विळखा; आरएमसी प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची 'तस्करी'मध्ये एन्ट्री; इम्रान हाश्मीसोबत शेअर करणार स्क्रीन

SCROLL FOR NEXT