PM Narendra Modi at Lok Sabha 
देश

लोकसभेतील PM मोदींच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं, यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच कोविड काळात काँग्रेस चुकीच्या पद्धतीनं वागल्याचंही मोदी आपल्या भाषणात म्हणाले. त्याचबरोबर इतरही विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं, यांपैकी महत्वाचे दहा मुद्दे आपण पाहुयात. (ten important points in PM Narendra Modi speech in Lok Sabha)

१) लता मंगेशकर यांना श्रद्धांजली : पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहून केली. लता दीदींची गायकी ही देशाच्या अखंडतेसाठी प्रेरक असल्याचं मोदी म्हणाले.

२) आत्मनिर्भर भारत अभियानावर भाष्य : मोदी म्हणाले, कोरोनाच्या काळानंतर जगानं नव्या अर्थव्यवस्थेला जन्म दिला आहे. भारतानं ही संधी गमावता कामा नये. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ व्या वर्षात आपल्यासाठी ही एक प्रेरणादायी संधी आहे. नव्या संकल्पांसह जेव्हा देश स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरा करेल तेव्हा आम्ही संपूर्ण सामर्थ्य आणि शक्तीनं तिथंपर्यंत पोहोचू.

३) गरीबीवरुन विरोधकांवर साधला निशाणा : गरीबी हटाओ हा नारा मोठ्या काळापासून सुरु आहे. याची व्यापकता आता वाढली आहे. आत्ता गरीबांना घरं, शौचालये उपलब्ध झाली आहेत. गरिबांच्या घरात आता वीज, गॅस आला आहे. पण अजूनही काही लोक हे सन २०१४ मध्येच अडकून पडले आहेत. यातून त्यांना बाहेर पडता येत नाहीए.

४) काँग्रेसवर साधला निशाणा : भारताच्या जनतेनं काँग्रेसला ५० वर्षांपूर्वी पसंती दिली होती. काँग्रेसनं तेलंगाणा, झारखंडची निर्मिती केली तरी देखील या राज्यातील जनेतनं काँग्रेसला नाकारलं आहे. इतक्या मोठ्या लोकशाहीतही काँग्रेसला जनता का नाकारते?

५) कोविड महामारीवर केलं भाष्य : मोदी म्हणाले गेल्या दोन वर्षात १०० वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी मानवजात झुंजत आहे. मेड इन इंडिया लसींनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. आज भारत शंभर टक्के पहिल्या डोसच्या पूर्ततेपर्यंत पोहोचला आहे. तसेच ८० टक्के दुसरा डोसचा टप्पाही पार केला आहे.

६) योग विद्येचं महत्वाही केलं विषद : मोदींनी आपल्या भाषणात योग विद्येचं महत्वही अधोरेखित केलं. कोरोनाच्या काळात लोकांनी योगासनांवर भर दिला. याचीही विरोधकांनी खिल्ली उडवली. तुम्हाला मोदींना विरोध करायचा असेल तर करा पण लोकांच्या भल्याच्या गोष्टींना विरोध नको. आता शंभर वर्षे सत्तेत न येण्याची काँग्रेसची मानसिकता झाली आहे.

७) मेक इन इंडियाचे फायदे : मोदी म्हणाले ते म्हणतात मेक इन इंडिया अस्तित्वातच येऊ शकत नाही. त्यांना याचाही आनंद होत आहे. पण देशातील नव उद्योजकांनी हे दाखवून दिलंय की तुम्हीच आता चेष्टेचा विषय झाला आहात. मेक इन इंडियाला विरोध यासाठी होतोय कारण यामुळं कमिशनचे रस्ते बंद झाले आहेत. यामुळं भ्रष्टाचाराचे मार्ग बंद झाले आहेत.

८) महागाईच्या मुद्द्यांवर दिलं उत्तर : मोदी म्हणाले, विरोधकांनी महागाईचा मुद्दा देखील उपस्थित केला. काँग्रेसनं सत्तेच्या शेवटच्या पाच वर्षात देशाला दोन अंकी महागाई झेलावी लागली. काँग्रेसची धोरणंच अशी होती की त्यांनाच वाटतं होतं की महागाईचा मुद्दा आपल्या हाताबाहेर गेला आहे. अर्थमंत्र्यांनी स्वतः म्हटलं होतं की, महागाई कमी होण्यासाठी एखाद्या अल्लाउद्दीनच्या चिरागची आशा बाळगू नका. पण २०१४ ते २०२० मध्ये देशातील महागाई पाच टक्क्यांनी कमी राहिली. कोरोनामुळं यंदा महागाई २२.२ टक्के राहिली.

९) संरक्षण क्षेत्राचा केला उल्लेख : काँग्रेसनं पन्नास वर्षे देश चालवला या काळात केवळ संरक्षण क्षेत्रचं पाहिल तर लक्षात येईल की, त्यांचं काय सुरु होतं. नवी उपकरण खरेदीची प्रक्रिया अनेक वर्षे चालायची. जेव्हा ही उपकरण यायची तेव्हा ते तंत्रज्ञान जुनं झालेलं असायचं. पण आम्ही संरक्षण क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. दुसऱ्यांवर अवलंबून राहून आपण देशाची सुरक्षा करु शकत नव्हतो. त्यामुळं यामध्ये आपण आत्मनिर्भर होणं गरजेचं होतं. या बजेटमधूनही आम्ही जास्तीत जास्त उपकरण भारतातच बनवण्याची तरतूद केली आहे. भारतच आता डिफेन्स एक्सपोर्टर होण्यावर आमचा भर आहे.

१०) नेहरुंचं नाव घेत काँग्रेसवर निशाणा : पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या काळातील महागाईवरुन पंतप्रधान नेहरु यांनी लाल किल्ल्यावरुन काय म्हटलं होतं. नेहरुंनी त्यावेळी असं म्हटलं होतं की, कोरियामध्ये लढाई झाली तरी त्याचा आपल्यावर परिणाम होतो. त्यामुळं वस्तूंच्या किंमती वाढतात. त्यामुळं या आपल्या नियंत्रणाबाहेर जातात. तसंच अमेरिकतही काही झालं तर त्याचा आपल्यावर परिणाम होतो. आज आमेरिकेतही महागाई ७ टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT