water drown Sakal media
देश

उत्तर प्रदेश : नदीत बोट उलटून दहा महिला बुडाल्या; तीन तरुणींचा मृत्यू

या बोटीतून प्रवास करणाऱ्या सर्व महिला या शेतमजूर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कुशीनगर : उत्तर प्रदेशात नदीत बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या बोटीतून दहा जण प्रवास करत होते. यांपैकी तीन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, बचावकार्य अद्याप सुरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. (ten women drowned in river when boat capsized Death of three girl)

सुत्रांच्या माहितीनुसार, कुशीनगर येथील खड्डा भागात बुधवारी सकाळी नारायणी नदीत महिला शेतमजुरांना घेऊन जाणारी नाव नदीत पलटल्याची मोठी दुर्घटना घडली. या नावेतून नऊ महिला प्रवास करत होत्या तर एक नावाडी होता, असे सर्व दहा जण बोट पलटल्यानं पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती कळताच मच्छिमारांनी नदीत उड्या घेत सात महिलांचा जीव वाचवला. तर तीन तरुणी बेपत्ता होत्या. तसेच प्रशासनाला याची माहिती कळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरु केलं.

तब्बल एक तासांच्या बचाव मोहिमेनंतर तीन तरुणींचे मृतदेह हाती आले आहेत. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानं गावामध्ये एकच कल्लोळ माजला. या बोटीतून शेतमजूर महिला किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूकडील गव्हाच्या कापणीसाठी निघाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT