CBSE sakal media
देश

व्हायरल झालेलं दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक बनावट - CBSE

टर्म १ चं वेळापत्रक सोशल मीडियात व्हायरल

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सोशल मीडियात सध्या व्हायरल झालेल्या सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक (डेटशीट) फेक (बनवाट) असून ते बोर्डानं जाहीर केलेलं नाही, असं स्पष्टीकरणं स्वतः सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आलं आहे.

दहावी, बारावीच्या पहिल्या टर्मच्या परीक्षेचे वेळापत्रक सीबीएईकडे तयार आहे. मात्र, बोर्डाकडून अधिकृत न केलेलं वेळापत्रक सोशल मीडियामध्ये सध्या व्हायरल झालं आहे. यावर बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. बोर्डानं ट्विटद्वारे म्हटलं की, "आम्हाला हे दिसून आलं आहे की, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या पहिल्या टर्मचं वेळापत्रक सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं आहे. त्यामुळे हे स्पष्ट करण्यात येत आहे की, या परीक्षांसंदर्भात आत्तापर्यंत बोर्डानं कुठल्याही प्रकारचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेलं नाही."

दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी म्हणजे आजच CBSEच्या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक जाहीर होणार आहे, अद्याप ते जाहीर झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT