cow attack esakal
देश

काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO; शाळेतून घरी परतणाऱ्या मुलीवर गाईचा हल्ला

Terrifying Video : शहरातून काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.शाळेतून परत येणाऱ्या एका लहान मुलीवर गाईने हल्ला केला आहे

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई- शहरातून काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.शाळेतून परत येणाऱ्या एका लहान मुलीवर गाईने हल्ला केला आहे. यात मुलगी गंभीर जखमी झालीये. व्हिडिओ इतका भयानक आहे की अंगावर काटा उभा राहतो. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीय.त्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहितीनुसार, लहान मुलगी शाळेवरुन परतत होती, तेव्हा गाईने तिच्यावर हल्ला केला. (Terrifying Video CCTV Chennai Schoolgirl Returning Home Brutally Attacked By Cow )

सदर घटना ९ ऑगस्टची असून चेन्नईच्या एमएमडीए कॉलनीमधील आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की मुलगी तिच्या आई आणि लहान भावासोबत रस्त्यावरुन जात होती. यावेळी तेथे उभ्या असलेल्या दोन गाईंपैकी एका गायीने मुलीवर हल्ला केला.गाईने मुलीला शिंगावर उचललं आणि तिला जमिनीवर आदळलं. त्यानंतर गाईने वारंवार मुलाला शिंगावर उचलून खाली पाडलं. तसेच मुलीला तुडवलं. माहितीनुसार, मुलीच्या भावाने काही आवाज काढला होता, त्यानंतर गाईने असे कृत्य केले. (Latest Marathi news)

मुलीवर हल्ला होत असताना आई आणि भाऊ कसेबसे बाजूला झाले. दोन्ही गाई मुलीवर हल्ला करतच होत्या. आईने आरडाओरडा केला, तसेच मुलीला गाईच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. यावेळात आजुबाजूचे रहिवाशी आणि वाटसरु तेथे आले. त्यांनी दगडं मारुन गाईला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही मुलीला सोडवता आलं नाही. जवळपास एक मिनिटे हा थरार सुरु होता, शेवटी एक माणूस काठी घेऊन गाईच्या अंगावर गेला तेव्हा कुठे गाई पळून गेल्या.

हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झालीये. तिला नीट उभे देखील राहता येत नव्हतं. मुलीला त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गाईच्या मालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच गाईला जेरबंद करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे भटक्या जनावरांजवळून जाताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT