Terrorism is a violation of human rights Amit Shah
Terrorism is a violation of human rights Amit Shah Team eSakal
देश

दहशतवाद म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन : अमित शहा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दहशतवाद म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. त्यामुळे लोकांच्या अधिकारांची जपणूक करण्यासाठी या उपद्रवाचे समूळ उच्चाटन गरजेचे आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) आज झालेल्या १३ व्या स्थापना दिन कार्यक्रमात गृहमंत्री शहा बोलत होते. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कुरापतींना चाप लावण्यात ‘एनआयए’च्या कामगिरीची प्रशंसा करताना गृहमंत्री शहा म्हणाले, की सरकार दहशतवादाविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’च्या धोरणानुसार पुढे जात असून काश्मीरमध्ये दहशतवादाला मिळणारी आर्थिक रसद तोडण्यासाठी ‘एनआयए’ने नोंदविलेल्या गुन्ह्यांमुळे तेथील दहशतवादाला आळा घालण्यात लक्षणीय यश आले आहे. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेणी, नितीश प्रामाणिक हे देखील यावेळी उपस्थित होते.

मानवाधिकारांबद्दल बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, की दहशतवाद हा सभ्य समाजासाठी अभिशाप असून भारताने याची दीर्घकाळ झळ सोसलेली आहे. दहशतवाद्यांविरुद्ध करवाई करताना मानवाधिकारांशी संबंधित गटांकडून मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र, दहशतवादापेक्षा मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी मोठी गोष्ट अन्य कोणतीही नाही. दहशतवाद हेच मुळात मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी दहशतवादाचे उच्चाटन आवश्यक आहे.‘एनआयए’ने ४०० गुन्हे नोंदविले असून ३४९ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले तर गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ९३.२५ टक्के आहे, या आकडेवारीकडे लक्ष वेधताना गृहमंत्री म्हणाले, की ज्या गुन्ह्यांमध्ये साक्षीदार मिळणार नाही, अशा गुन्ह्यांचा तपास ‘एनआयए’तर्फे केला जातो आणि या अडचणींवर मात करून ‘एनआयए’ने मिळवलेले यश प्रेरणादायक आहे. ‘एनआयए’ला सहकार्य करण्यात केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीही शहा यांनी यावेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

SCROLL FOR NEXT