Terrorist Abdul Salam Bhuttawi dies in jail Punjab province of Pakistan sakal
देश

Terrorist Abdul Salam Bhuttavi : दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील तुरुंगात मृत्यू

दहशतवादाला निधी पुरविल्याप्रकरणी तो शिक्षा भोगत होता

सकाळ वृत्तसेवा

लाहोर : मुंबईवर हल्ला करण्यासाठी ‘लष्करे तैयबा’च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील एका तुरुंगात मृत्यू झाला. दहशतवादाला निधी पुरविल्याप्रकरणी तो शिक्षा भोगत होता.

त्याने पंजाब प्रांतात लष्करे तैयबाचा तळ सुरु केला होता. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचा तो मुख्य सहकारी होता. भुट्टावी याला २०१९ मध्ये अटक झाली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच होता.

दोन दिवसांपूर्वी ७७ वर्षांच्या भुट्टावी याच्या छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. आज ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. हाफिज सईद हा देखील सध्या तुरुंगात असून त्याने भुट्टावी याच्या दफनविधीला हजर राहण्याची परवानगी मागितली होती. ती नाकारण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT