attack esakal
देश

बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; 10 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात पाकिस्तानच्या एकूण 10 सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी सैन्याच्या मीडियाने (आयएसपीआर) या हल्ल्याबाबत माहिती दिली. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. (Pakistan Terror Attack)

आयएसपीआर (ISPR) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२७) बलुचिस्तान येथील केच परिसरातील सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करत गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जवळपास 10 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला असून काही सैनिक जखमी झाले आहेत.

साधारणत: 25 ते 26 जानेवारीच्या रात्री या हल्ल्याची घटना घडली असल्याची माहिती पाकिस्तनी (Pakistans) सैन्याने दिली आहे. या हल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून जागोजागी संबंधित अर्लट जारी करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

या कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांना पकडले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला बलुचिस्तान प्रांत अनेक दिवसांपासून हिंसक बंडखोरीचा केंद्रबिंदू आहे. या भागातील चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पांना लक्ष्य करून बलुच बंडखोर गटांनी यापूर्वी अनेक हल्ले केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

'ये तू इथून जा रे...' मराठी अभिनेत्यावर चांगलेच भडकलेले अशोकमामा आणि सचिन पिळगावकर, म्हणालेले...'याला इकडून हाकला रे…'

Maharashtra Kesari: उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट; माती-गादी विभागात अंतिम फेरीसाठी मल्ल सज्ज

SCROLL FOR NEXT