Piyush Goyal
Piyush Goyal sakal media
देश

"वस्त्रोद्योगावरील प्रस्तावित GST दरवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घेऊ"

कृष्ण जोशी

मुंबई : वस्त्रोद्योग क्षेत्रावरील (Textile Industry) प्रस्तावित वाढीव जीएसटीचे दर (GST rates reducing proposal) कमी करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे जीएसटी काउंसिलकडे (GST Council) विनंती प्रस्ताव पाठवला जाईल, असे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (Maharashtra chamber of commerce industry and agriculture), इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

'महाराष्ट्र चेंबर' चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी नवी दिल्ली येथे गोयल यांची भेट घेऊन त्यांना वस्त्रोद्योगासमोरील विविध समस्यांचे निवेदन दिले. विशेषत: वस्त्रोद्योगातील प्रस्तावित जीएसटी दरवाढीमुळे या क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता असून ही दरवाढ रद्द करणे आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन गांधी यांनी केले.

वस्त्रोद्योगासमोरील जीएसटी दरवाढीसह सर्व अडचणींची सरकारने योग्य दखल घेतली आहे. दरवाढीचा हा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला असल्याने यासंदर्भात मंत्रालयातर्फे जीएसटी कौन्सिलकडे पाठपुरावा करून ही दरवाढ रद्द करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गोयल यांनी यासंदर्भात सांगितले.

तांत्रिक वस्त्रोद्योगासारख्या नवीन क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध असून आगामी काळात 'महाराष्ट्र चेंबरने' पुढाकार घेऊन नवीन संधीची माहिती व्यापार-उद्योग क्षेत्रापर्यंत पोहोचवावी व अधिकाधिक लोकांना नव्या संधीचा फायदा करून द्यावा असे आवाहनही गोयल यांनी यावेळी केले. याप्रसंगी 'फिक्की'चे माजी अध्यक्ष झायडस कॅडीला चे अध्यक्ष पंकज पटेल, महाराष्ट्र चेंबर चे कौन्सिल सदस्य मनप्रीत नागी, दिल्ली प्रतिनिधी जे. के. जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT