navneet rana 
देश

दंगलीमागे ठाकरे सरकारचा छुपा हेतू; खासदार नवनीत राणा यांचा आरोप

नवनीत राणा यांनी आज अमरावती दंगलीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमरावतीची जनता सहिष्णू आहे. ती कधीच दंगल करणार नाही. यामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा छुपा हेतू होता. मात्र ही दंगल पूर्वनियोजित होती, असा आरोप केला जातो. मग उद्धव ठाकरे झोपा काढत होते का, त्यांनी होणारी अनुचित घटना का रोखली नाही, अशी घणाघाती टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

नवनीत राणा यांनी आज अमरावती दंगलीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दंगली झाल्या नाहीत. त्यांनी सर्व जातीधर्मांशी सलोखा राखत राज्य कारभार केला. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगल झाली, हे त्यांचे अपयश आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली. आता ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप ते करीत आहेत. पण सरकार तुमचे होते. मग होणारी घटना तुम्ही रोखू का शकला नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

दंगल झाल्यानंतर भाजपवर टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना दंगल का झाली, याचे प्रथम जनतेला उत्तर द्यावे. या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

- नवनीत राणा, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT