Narendra Modi esakal
देश

नेटकरी म्हणतायत, धन्यवाद मोदीजी!

बरं हे धन्यवाद पंतप्रधान मोदींना का ?

गणेश पिटेकर

सोशल मीडियावर काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. आज गुरुवारी (ता.२१) ट्विटरवर धन्यवाद मोदीजी (#ThankYouModiji) हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. बरं हे धन्यवाद पंतप्रधान मोदींना का ? समीरन दास यांनी अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या शेजारील देशांमधील पेट्रोलचे दर भारतापेक्षा किती कमी आहेत. याबाबतची माहिती शेअर केली आहे. दुसरीकडे कुमार साकेत चंद्रवंशी म्हणतात, की जागतिक भूक निर्देशांकात एकूण ११५ देशांच्या यादीत भारत १०१ क्रमांकावर त्यामुळे मोदींचे धन्यवाद! कुमार यांनी एक व्यंगचित्र आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहे. तसेच (PM Narendra Modi) ओम या हँडलवर एकाने विश्वगुरुचे रिपोर्ट कार्ड शेअर केले आहे. यात २०१४ व २०२१ या वर्षांमध्ये भूक, आनंद, लोकशाही, माध्यम स्वातंत्र आणि लिंगभाव निर्देशांकात भारताची कशी अधोगती सुरु आहे, हे सांगितले आहे. अनेकांनी १०० कोटींपेक्षा जास्त कोरोना लसीकरण झाल्याबद्दल मोदींना धन्यवाद म्हटले आहे.

- विनित गोएंका म्हणतात, की भारताने कोरोना लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा पार केला आहे. त्यामुळे धन्यवाद मोदींजी!

- मक्या या टि्वट हँडलवर चौकीदार किंवा चहावाल्याने कोरोना लसीकरणासाठी अनुदान दिले नव्हते, असे म्हटले. आयटी सेलकडून मोदींना क्रेडिट देण्याचे उद्योग सुरु असल्याची टीका केली आहे.

- प्रभाकर यांनी आशा आहे की तुमच्या बँक खात्यात १५ लाख जमा झाले असेल. त्यामुळे #Thankyoumodiji !!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

Kolhapur Municipal : १० कोटींच्या थकबाकीसाठी धडक कारवाई; जलसंपदा विभागाचे २४ विभाग सील

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

SCROLL FOR NEXT