Amit shaha sakal
देश

भाजपचे सरकार गोरगरीबांसाठी काम करणारे सरकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : भाजपचे सरकार गरिबांतील गरिबांसाठी काम करत असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘माझा परिवार-भाजप परिवार’ या मोहिमेचे उद्‌घाटन शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, ते बोलत होते. शहा म्हणाले, की भाजपने उत्तर प्रदेशला पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. उत्तर प्रदेशला देशातील सर्वाधिक आघाडीवरील राज्य करण्यासाठी भाजपने खूप कष्ट घेतले. सरकार केवळ एखाद्या घराण्यासाठी नसते तर ते राज्यातील गरिबांतील गरिबांसाठी असते, हे भाजपने सिद्ध केले, असा टोलाही त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला. गेली पाच वर्षे घरात बसून राहिलेले लोक आता घराबाहेर येऊन सरकार स्थापण्याचा विचार करत आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला.काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख न करत शहा पुढे म्हणाले, की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपण परदेशात किती दिवस होतो. कोरोना साथीत व पुरात कोठे होतो, हे सांगावे. विरोधक केवळ आपल्या कुटुंबासाठी काम करतात.

‘राम मंदिराची निर्मिती अभिमानास्पद’
योगी आदित्यनाथ म्हणाले, की केंद्रात तसेच उत्तर प्रदेशात भाजप विजयी होण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक अडथळ्यांवर मात केली. त्यांनी दंगलींचाही सामना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात राम मंदिराची निर्मिती होत आहे, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. यंदा संपूर्ण जग अयोध्येतील दीपोत्सवचा लखलखाट पाहील, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT