minor bride esakal
देश

नवरदेवाचा चेहरा पाहताच नवरीने लग्न मंडपातून काढला पळ; म्हणाली फोटोतील...

सकाळ डिजिटल टीम

लखनौ - यूपीच्या इटावामधील एका लग्नात घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वधूला वराचा चेहरा आवडला नाही म्हणून तिने लग्नाला नकार दिला. विशेष म्हणजे नवरीने वरासोबत दोन फेरेही घेतले होते, मात्र नवरदेवाला पाहिल्यानंतर तिचा पारा चढला आणि तिने तिथून पळ कढला. (bride refuses to marry)

नवरीच्या ही कृती पाहून नवरदेवाकडची मंडळी थक्क झाली होती. लग्नापूर्वी ज्या मुलाचा फोटो दाखवला होता तो मुलगा तिथे नव्हता, असा आरोप वधूने केला आहे. तसेच नवरादेवाचं वय खूप जास्त असल्याचं वधूचं म्हणणं होतं. यावेळी सर्वांनी वधूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वधुवर अखेरपर्यंत कोणाच्याही बोलण्याचा परिणाम झाला नाही. परिणामी, नवरदेवाला वधूशिवाय वऱ्हाड परत न्यावे लागले.

हे प्रकरण भरठाणा भागातील झिंदुआ गावातील आहे. नागलाबाग येथील रहिवासी असलेल्या मुलीचे लग्न समथर जाफरपूर येथील 30 वर्षीय मुलासोबत निश्चित झाले होते. बुधवारी लग्नाचं वऱ्हाड विवाहस्थळी वेळेत पोहोचलं होतं. त्यानंतर लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. सात फेऱ्यांसाठी वधू-वर दोघेही मंडपात पोहोचले होते. फेऱ्यांना सुरुवात झाली, त्याचवेळी नवरीची नजर तिच्या भावी नवऱ्याच्या चेहऱ्यावर पडली. वराचा चेहरा पाहून वधूचा पारा चढला. दोन फेऱ्यांनंतर वधू मंडपातून बाहेर पडली आणि तिने लग्नाला नकार दिला.

लग्नाला नकार देण्याचा वधुचा निर्णय़ ऐकून वऱ्हाडींमध्ये एकच खळबळ उडाली होती. उपस्थितांनी वधूला लग्नास नकार देण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की, तिला लग्नापूर्वी दाखवलेला फोटो दुसऱ्या मुलाचा होता अन् लग्न दुसऱ्याशी केले जात आहे. वधूने सांगितले की, ज्या व्यक्तीशी तिचे लग्न होत आहे त्या व्यक्तीचे वय दुप्पट आहे. तसेच वराचा चेहराही काळा आहे. दरम्यान वधुच्या आई सांगितलं की, लग्नासाठी ज्या मुलाचा फोटो दाखविण्यात आला होता, तो मुलगा लग्नावेळी नव्हताच. त्यामुळे मुलीने लग्नास नकार दिला. तर दुसरीकडे नवरदेवाच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : इस्लामपूरचं नाव बदललं! आजपासून ईश्वरपूर

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT