sanjay raut sakal media
देश

पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे कमी केले इंधनाचे दर; संजय राऊतांचे केंद्राला चिमटे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काल केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर क्रमश: पाच आणि दहा रुपयांनी कमी करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे पेट्रोलचे दर कमी केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारला चिमटे काढत त्यांनी म्हटलंय की, पेट्रोलचे दर 50 रुपयांनी कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल.

त्यांनी म्हटलंय की, 100 रुपये दर वाढवले आणि आता फक्त पाच रुपये कमी केले आहेत. खरं तर इंधनाच्या भाववाढीतून बेहिशेबी पैसे केंद्र सरकारने कमावले आहेत. करायचे होते तर केंद्राने 25 रुपये कमी करायला हवे होते. याचं कारण असं आहे की, केंद्र सरकारचं मोठं मन नाहीये. कुजकं आणि सडकं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी म्हटलंय की, केंद्र सरकारने लादलेली महागाई आहे ही, या महागाईशी कसा सामना करणार? काल पाच आणि दहा रुपये पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. तेवढ्याने काय होणार? पोटनिवडणुका हरल्यानंतर जाग आली. या पराभवानंतर पाच रुपये कमी झाले. जर 50 रुपये कमी करायचे असतील तर आपल्याला संपूर्ण भाजपचा पराभव करावा लागेल. महागाईमुळे दिवाळीचं वातावरण नाहीये.

मोठं मन दाखवायला मन असावं लागतं. केंद्रानं किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी करायचे, याला मोठं मन म्हणत नाहीत. लोकं पेट्रोल पंपावरती आता 15-20 रुपयाचे डिझेल टाकत आहेत.पेट्रोल डिझेलचे दर राज्य सरकार वाढवत नाहीत, ते केंद्र सरकार वाढवतं. त्यामुळे याबाबत बोट तुमच्याकडेच दाखवावं लागणार, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT