स्वत:चा व्यवसाय करायचाय? सरकार करेल मदत! आता चुटकीसरशी होतील कामे esakal
देश

स्वत:चा व्यवसाय करायचाय? सरकार करेल मदत; आता चुटकीसरशी होतील कामे

स्वत:चा व्यवसाय करायचाय? सरकार करेल मदत! आता चुटकीसरशी होतील कामे

सकाळ वृत्तसेवा

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार 'स्वतःचा व्यवसाय' यावर भर देत आहे.

आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) अभियानांतर्गत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government) 'स्वतःचा व्यवसाय' यावर भर देत आहे. त्यामुळेच स्वत:चा व्यवसाय- उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांना बॅंकांकडून सुलभ अटींवर कर्ज वाटप केले जात आहे. केंद्र (Central Government) किंवा राज्य सरकारने (Statr Government) अशा अनेक योजना आणल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू करू शकता.

उदाहरणार्थ, केंद्र सरकारकडून राज्य सरकारांच्या सहकार्याने सुरू केलेल्या 'एक जिल्हा एक उत्पादन योजने' अंतर्गत जिल्ह्यातील उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानावर प्रक्रिया युनिट प्रदान केले जात आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार व्यवसाय निवडू शकता. सरकारच्या स्वावलंबी भारत मोहिमेत व्यवसाय सुरू करण्यापासून ते कागदपत्रे, यंत्रसामग्री, कर्ज मंजुरीपर्यंतची कामे FoodPro ECS सारखे औद्योगिक सल्लागार करत आहेत.

FoodPro ECS चे संचालक धीरेंद्र कुमार यांच्या मते, उद्योग उभारण्यासाठी नवीन व्यावसायिकांना शक्‍य ती सर्व मदत केली जाते. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) अन्न प्रक्रिया उद्योग, यंत्रसामग्री आणि उपकरणे, मिठाई आणि दूध उत्पादन उपकरणे, कोल्ड रूम, शीतगृहे, राईपनिंग चेंबर्स, मिलिंग मिल्स, पॅकेजिंग मशीन, मध प्रक्रिया मशीन, बेकरी, ग्रेडिंग आणि सफाई मशीन्स आदी अचूक निवड, खरेदी, अनुदान यासह इतर सर्व माहिती दिली आहे.

उदाहरणासह समजून घ्या

जर तुम्हाला फूड प्रोसेसिंगशी संबंधित व्यवसायात रस असेल, तर तुम्ही पंतप्रधान मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (PMFME) योजनेचा लाभ घेऊ शकता. पीएमएफएमईशी संबंधित असलेले फूड टेक्‍नॉलॉजिस्ट आदित्य अजय म्हणतात की, ही योजना सध्याच्या किंवा नवीन फूड बिझनेस उद्योजकांसाठी खूप प्रभावी आहे. तुम्ही सरकारच्या https://pmfme.mofpi.gov.in/mis/#/Login या वेबसाइटवर क्‍लिक करून नोंदणी करू शकता.

सर्व माहिती सबमिट केल्यानंतर, स्वयंचलित तपशील प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. जिल्हास्तरीय समितीची संमती मिळताच अनुदानाची रक्कम कर्ज देणाऱ्या बॅंकेला उपलब्ध करून दिली जाते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वत:चा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी मुद्रा लोनही सुरू केले होते. या अंतर्गत तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT