sc sakal
देश

सरन्यायाधीशांनी टोचले प्रसारमाध्यमांचे कान

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी आज नाराजी व्यक्त करताना हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा/(पीटीआय)

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत होणाऱ्या कॉलेजियमच्या बैठकांबाबत माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या वार्तांकनावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी आज नाराजी व्यक्त करताना हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. न्या. नवीन सिन्हा यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रमणा यांनी उपरोक्त भावना व्यक्त केल्या. न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेचे एक विशिष्ट पावित्र्य असून त्याला एक प्रतिष्ठा देखील जोडल्या गेलेली आहे.

माध्यमांनी देखील हे पावित्र्य समजून घ्यायला हवे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. न्या. रमणा म्हणाले, की ‘‘ माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि मतांवर मला भाष्य करायचे आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, आम्हाला न्यायाधीशांची नियुक्ती करणे गरजेचे असते. सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. आता बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया ही एक पवित्र गोष्ट असून त्याच्याशी निश्चित अशी एक प्रतिष्ठा जोडल्या गेली आहे. माध्यमांमधील माझ्या मित्रांनी या प्रक्रियेचे पावित्र्य समजून घ्यायला हवे.’’ एक संस्था म्हणून सर्वोच्च न्यायालयाला माध्यमांचे स्वातंत्र्य मान्य असून व्यक्तीच्या अधिकारांना देखील तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. आज काही माध्यमांत प्रलंबित प्रक्रियेबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या अत्यंत प्रतिकूल स्वरूपाच्या असतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT