President Ramnath Kovind address to Country
President Ramnath Kovind address to Country  
देश

कोरोनाच्या नियमाचं पालन करणं हा राष्ट्रधर्म - राष्ट्रपती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोना महामारी (Corona epidemic) अद्याप संपलेली नाही त्यामुळं सर्वांनी अद्याप यासंबंधिच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी देशवासियांना केलं आहे. तसेच नियमांचं पालन करणे म्हणजे राष्ट्रधर्म आहे, जोपर्यंत ही स्थिती निवळत नाही तोपर्यंत या राष्ट्रधर्माचं सर्वांनी पालन करावं असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (Eve of Republic day) राष्ट्राला उद्देशून राष्ट्रपतींनी भाषण केलं. यामध्ये त्यांनी देशाच्या आजवरचा प्रवास उलगडून दाखवला. (The Corona epidemic is not over yet Dont ignore the rules Pres Ramnath Kovind)

राष्ट्रपती म्हणाले, मानव समुदयाला एकमेकांच्या सहकार्याची गरज यापूर्वी कधीही पडली नव्हती जितकी आज आहे. दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण मानवाचा कोरोना विषाणूशी संघर्ष अद्याप सुरुच आहे. या महामारीनं हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळं संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आघात झाला आहे. जागतीक समुदयाला या अभुतपूर्व आपत्तीचा सामना करावा लागला आहे. नवनवी रुपं धारण करत हा विषाणून नवीन संकट निर्माण करतो आहे.

भारताच्या जागतीक योगदानाचं कौतुक होतंय

महामारीचा सामना करणं भारतासाठी कठीण जाणं अपेक्षित होतं. आपल्या देशात लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. तसेच विकसनशील अर्थव्यवस्था असल्यानं आपल्याजवळ या अदृश्य शत्रूसोबत लढण्यासाठी पायाभूत सुविधा तसेच पुरेसे संसाधनं उपलब्ध नव्हते. परंतू अशा कठीण वेळेसच कोणत्याही राष्ट्राची संघर्ष करण्याची क्षमता उजळून निघते. पण मला सांगायला आनंद वाटतो की, आपण कोरोना विषाणूविरोधात दृढ संकल्प दाखवून दिला आहे. आपण आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आणि अधिक सक्षम केल्या. तसेच दुसऱ्या देशांच्या मदतीसाठी देखील पुढे आलो. दुसऱ्या वर्षी आपण स्वदेशी लसी देखील विकसित केल्या. तसेच जगातील सर्वात मोठा लसीकरण अभियान सुरु केलं. हे अभियान वेगानं पुढे जात आहे. भारताच्या या योगदानाची जागतीक स्तरावरही कौतुक करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या नियमाचं पालन करणं हा राष्ट्रधर्म

दुर्दैवानं संकटाची स्थिती येत असते कारण विषाणू पुन्हा आपलं रुप बदलून येत आहे. यामध्ये अनेक कुटुंब भयानक आपत्तीतून गेले आहेत. आपलं सामुहिक दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण एकमात्र दिलासा देणारी गोष्ट ही आहे की, अनेक लोकांचा जीव वाचवण्यात आला आहे. महामारीचा प्रभाव अद्यापही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं आपण सतर्क राहिलं पाहिजे तसेच आपल्या सुरक्षेत कोणतीही ढील देता कामा नये. आपण आजवर सावधानता बाळगली आहे ती अशीच पुढे सुरु ठेवायची आहे. यासाठी मास्क वापरणं आणि सोशल डिस्टंसिंग राखणं हे कोविड अनुरुप व्यवहारांचा भाग राहिला आहे. कोविड महामारीच्या लढाईत वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी सांगितलेल्या सावधानतेचं पालन करणं आज प्रत्येक देशवासियाचा राष्ट्रधर्म बनला आहे. जोवर हे संकट दूर होत नाही तोवर आपल्याला हा राष्ट्रधर्म पाळायचाच आहे, असं आवाहनही यावेळी राष्ट्रपतींनी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT