Luv Agraval 
देश

कोरोना महामारी संपण्याला अजून बराच काळ - आरोग्य मंत्रालय

जगभरात दखलपात्र कोरोना प्रकरणांची नोंद

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जगातील एकूण परिस्थिती लक्षात घेता कोरोनाची महामारी संपण्याला अजून बराच काळ आहे, असं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी व्यक्त केलं आहे. जगभरात सध्या दखल घ्यायला भाग पडेल इतक्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही काळजी वाढवणारी बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला नियमांचं कडक पालन करणं गरजेचं आहे, असंही अग्रवाल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या नेहमीच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. (The Corona Pandemic is far from over Luv Agrawal aau85)

अग्रवाल म्हणाले, "भारतात सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्यानं आठवड्याच्या सरासरी आकडेवारीत घट होत आहे. पण जर आपण कमी होणाऱ्या केसेसची सुरुवातीपासून आत्तापर्यंत तुलना केली तर ती कमी होताना दिसते आहे. पण काही ठराविक भागात अद्याप संख्येत घट होताना दिसत नाहीए, याबाबत आम्ही राज्यांशी चर्चा करत आहोत."

देशात सध्या ६२ जिल्हे आहेत जिथे दररोज शंभराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. ही ठिकाणं जिल्ह्यांमधील काही ठराविक ठिकाणीच दिसून येत आहे. यामध्ये २२ जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्यात केरळातील ७, मणिपूरची ५, मेघालयाचे ३ जिल्हे आहेत जिथे गेल्या चार आठवड्यांपासून कोरोनाच्या प्रकरणात वाढीची नोंद होत आहे. ही बाब काळजीत टाकणारी आहे, असंही लव्ह अग्रवाल यांनी सांगितलं.

owners="Sakal" sort="relevance,recent" keywordsselector="h1.news-title" showInfoCard="true">

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT