Special Session 
देश

Special Session: विशेष अधिवेशनाची तारीख ठरली; मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले जाणार?

The date of the special session was fixed; Will the Maratha reservation bill be presented? मराठा आरक्षणासाठी निर्णायक चर्चा; विधानसभेत नवे विधेयक?

कार्तिक पुजारी

मुंबई- १५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन भरवलं जाणार आहे. अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. अधिवेशनात नव्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Maratha reservation bill likely to be introduced in special session)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने अधिसूचना आणली आहे. त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. हरकतींचा विचार करुन विधेयक अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्य मासासवर्ग आयोगाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्याचा रिपोर्ट देखील अधिवेशनात मांडला जाणार आहे. अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन आणले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी दिली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आले होते. त्यांना अधिसूचनेचा कागद मिळाल्यानंतर ते वाशी येथून परत फिरले होते. तसेच अधिसूचनेतील मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी जरांगे १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार मराठा समाजाला दिलासा देऊ पाहात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT