देश

'केंद्र सरकारला ‘नार्सिसिझम’चा आजार; हुकूमशाहीकडे वाटचाल'

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : राज्यसभेत भाजपचे खासदार विरोधकांना वैचारिक काविळ झाल्याची टीका करतात. खरे तर केंद्र सरकारमधील लोकांनाच ‘नार्सिसिझम’चा आजार जडला आहे. कितीकाळ तुम्ही आत्मरत राहणार आहात? विरोधक हे तुमची स्तुती करण्यासाठी नाहीत. ते स्तुती करून लागले, तर लोकशाहीच संपुष्टात येईल. ही तर हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल आहे, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यसभा खासदार डॉ. फौजिया खान यांनी दिल्या.

गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज गोंधळामुळे चालत नाही. त्या पाश्‍वभूमीवर ‘सकाळ’ने आज खान यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ‘‘पेगॅसस प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी विरोधकांची मागणी आहे. ते सोडून चर्चा करा, असा सत्ताधाऱ्यांचा आग्रह का? या प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी विरोधकांची मागणी असेल, तर त्याचा आदर केंद्र सरकारने केला पाहिजे. पण सभागृहातील विरोधी पक्ष नेत्याला देखील बोलू दिले जात नाही, हा तर लोकशाही मूल्यांना धक्काच आहे. विरोधकांना संपवून लोकशाही जिवंत राहणार नाही.’’

भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी विरोधकंनी वैचारिक काविळीतून बाहेर पडावे, असे वक्तव्य राज्यसभेत केले आहे. त्यावर डॉ. खान म्हणाल्या, ‘‘केंद्र सरकारला केवळ त्यांची स्तुती हवी आहे. एवढी आत्मप्रियता चांगली नाही. जे चांगले बोलणार नाही, त्यांना बोलू दिले जाणार नाही. त्यांचे तोंड दाबण्याचा प्रकार सभागृहामध्ये केला जात आहे. परंतु, सरकारकडून होणाऱ्या चुका दाखविणे, चांगले काही घडण्यासाठी त्यांच्यावर टीका करणे, हे विरोधकांचे कर्तव्य आहे. पण ते बजावण्यापासून रोखले जात आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांची वाहवा करू लागेल, तर लोकशाहीचे ‘पुस्तक’ बंद करावे लागेल.’’

शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष

न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणे हा लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे. देशातील शेतकरी त्यानुसार आंदोलन करीत आहेत. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना त्यांचा विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याचे सोडून आंदोलन बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे. मनमानी पद्धतीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही तर केंद्राची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल आहे, अशी टीका डॉ. फौजिया खान यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT