When politics Maharashtra in trouble leaders raise border issue of Karnataka Basavaraj Bommai sakal
देश

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची किंमत 2500 कोटी रुपये; काँग्रेसचा भाजपवर आरोप

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बीके हरिप्रसाद यांनी आरोप केला की भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्रीपदासाठी 2,500 कोटी रुपये किंमत मोजावी लागते. मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीसाठी ही मोठी रक्कम असल्याचे ते म्हणाले.

बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी होणार असल्याची चर्चा गेल्या महिनाभराहून रंगली आहे. मात्र मुख्यमंत्रिपद विक्रीसाठी असल्याचा आरोप एखाद्या नेत्याने करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भाजप हायकमांडकडून कर्नाटकमध्ये आश्चर्याचा धक्का देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी आठ महिन्यांवर होणाऱ्या निवडणुकीपूर्वी बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदावरून गच्छंती होणार नसल्याचं पक्षातील अनेक नेत्यांनी सांगितले आहे.

राज्य भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, पक्ष समुदाय संतुलनासाठी हा निर्णय घेऊ शकतो, कारण लिंगायत समुदायातून येणारे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना पक्षाने संसदीय समितीमध्ये समाविष्ट केले आहे. तर बोम्मई देखील लिंगायत समाजातील आहे. त्यामुळे त्यांची जागा वोक्कालिगा समाजाकडून घेतली जाऊ शकते.

लिंगायत पंथाला खूश ठेवण्याच्या मोहिमेत ७९ वर्षीय येडियुरप्पा मोलाची भूमिका बजावत आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या 18 टक्के लिंगायत असून भाजपची व्होट बँक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर वोक्कालिगाची लोकसंख्या अंदाजे १५ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT