Omicron
Omicron sakal
देश

कर्नाटकनंतर गुजरातमध्ये आढळला ओमिक्रॉनचा रूग्ण; चिंता वाढली

सकाळ डिजिटल टीम

जामनगर : दक्षिण अफ्रिकेत ( South Africa) आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Corona New Variant Omicron) आता सगळीकडे पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकात (Karnataka) ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आल्यानंतर आता गुजरातमध्येदेखील (Gujrat) ओमिक्रॉन रूग्ण आढळून आला आहे, अशी माहिती गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे (Gujrat Health commissioner Jay prakash shivhare) यांनी दिली आहे. संक्रमित व्यक्ती झिम्बाब्वे (Zimbabwe ) येथून आली असून जामनगर (Jamnagar) येथे हा रूग्ण आढळून आला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाधित व्यक्तीचे वय 72 वर्षे असून गुरुवारी त्याचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह (Covis 19 Test) आला आहे. त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी ( genome sequencing) पुण्याला पाठवण्यात आले होते. झिम्बाब्वे येथून परतलेला रुग्ण 28 नोव्हेंबर रोजी जामनगर येथे आला होता.

रुग्णाचे दोन नमुने एक जीबीआरसी आणि दुसरे एनआयव्ही पुणे (NIV Pune) येथे पाठविण्यात आले. एनआयव्हीकडून संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच ही व्यक्ती झिम्बाब्वेची नागरिक आहे तर त्याची पत्नी जामनगरची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT