The Madhya Pradesh High Court recently denied bail to a woman who filed rape cases against five people. Esakal
देश

पतीसह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेला हायकोर्टाने का नाकारला जामीन? वाचा संपूर्ण प्रकरण

Madhya Pradesh High Court: "या प्रकरणातील महिलेला खोटे गुन्हे दाखल करण्याची सवय आहे. तसेच तिला ब्लॅकमेल करण्याची सवय आहे. ज्यामुळे अनेक लोक तिचे शिकार बनले आहेत."

आशुतोष मसगौंडे

MP High Court denied bail to a woman who filed rape cases against five people:

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नुकतेच पाच जणांवर बलात्काराचे गुन्हे दाखल करणाऱ्या महिलेला जामीन नाकारला.

या महिलेने एका व्यक्तीला मारहाण करत त्याचा दुकाणाची तोडफोड केली होती. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी जामीन मिळावा म्हणून महिलेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

या प्रकरणातील सर्व बाबी तपासल्यानंतर न्यायाधीश मनिंदर भट्टी यांना आढळले की, आरोपींच्या विरोधात खंडणीचे गुन्हे आहेत.

सुनावणीवेळी न्यायाधीशांना असे अढळले की, या महिलेने पूर्वी पाच वेगवेगळ्या पुरूषांविरोधात बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये तिने दोन खटले आपल्या पतीवरही दाखल केले आहेत.

न्यायालयाने म्हटले की, “तक्रारदार मोहित दुडेजा यांच्या जबाबावरून हे देखील स्पष्ट होते की, धमकी मिळाल्यावर त्याने या महिलेला 1,80,000 रुपये दिले होते. महिलेने विविध व्यक्तींविरुद्ध बलात्काराचे 5 खटले नोंदवले आहेत. ज्यात तिचा पती विकास रामराख्यानी विरुद्ध दोन प्रकरणांचा समावेश आहे."

भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत खंडणी, गुन्हेगारी धमकी आणि इतर गुन्ह्यांसाठी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिष्ठ न्यायालयातून जामीन न मिळाल्याने महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सुनावणीदरम्यान, महिलेच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, तिला कोणतीही रक्कम किंवा मालमत्ता किंवा मौल्यवान सुरक्षा दिलेली नसल्याने खंडणीचा गुन्हा उघड झाला नाही. ते पुढे म्हणाले की, ट्रायल कोर्टाने मागील काळातील अशाच प्रकारच्या खटल्यांचा दाखला देत जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांचा अर्ज फेटाळण्यासाठी अशा बाबींना आधार घेता येणार नाही, असे महिलेल्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.

यावर तक्रारदार आणि राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणातील महिलेला खोटे गुन्हे दाखल करण्याची सवय आहे. तसेच तिला ब्लॅकमेल करण्याची सवय आहे. ज्यामुळे अनेक लोक तिचे शिकार बनले आहेत.

दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, ते अर्जदारास जामीन देण्यास तयार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT