Corona Vaccine sakal
देश

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डनंतर संपूर्ण स्वदेशी असलेल्या कोवॅक्सिन लशीनेही दुष्परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे. बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) याच्या चाचण्या घेण्यात आल्‍या.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डनंतर संपूर्ण स्वदेशी असलेल्या कोवॅक्सिन लशीनेही दुष्परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे. बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) याच्या चाचण्या घेण्यात आल्‍या. चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या साधारण एक तृतीयांश लोकांमध्ये या लशीचे दुष्परिणाम दिसले आहेत.

भारत बायोटेक या कंपनीने कोरोना काळात संशोधन करून लशीचे उत्पादन केले होते. लशीच्या परिणामांच्या तपासणीसाठी चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील एक तृतीयांश लोकांमध्ये ‘ॲडव्हर्स इव्हेंट ऑफ स्पेशल इंटरेस्ट’ (एईएसआय- विशेष स्वारस्य असलेल्या प्रतिकूल घटना) दिसून आले आहेत. या चाचण्यांमधील निरीक्षणांची माहिती ‘स्पिंगरलिंक’ या ‘स्प्रिंगर’ने प्रकाशित केलेल्या नियतकालिक आणि इतर साहित्यांसाठी संयुक्त व्यासपीठावर प्रसिद्ध केली आहे.

महिला किशोरवयीन आणि ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांना कोवॅक्सिनची लस घेतल्यानंतर ‘एईएसआय’चा जास्त धोका असतो, असे अहवालात म्हटले आहे. एक वर्षे सतत निरीक्षणांतर हे दुष्परिणाम कायम होते, असे हे संशोधन करणारे ‘बीएचयू’मधील संख शुभ्र चक्रवर्ती आणि त्यांच्या चमूने सांगितले. यात नाव नोंदविलेल्या एक हजार २४ लोकांपैकी ६३५ किशोरवयीन आणि २९१ प्रौढांचे एक वर्षे सतत निरीक्षण केले.

अभ्यासानुसार, ३०४ (४७ .९ टक्के) किशोरवयीन आणि १२४ (४२.६ टक्के) प्रौढांमध्ये श्‍वसनासंबंधीचा संसर्ग (व्हायरल अप्पर रेस्पेरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) आढळून आला. अशा लोकांमध्ये सर्दी, खोकला अशा समस्या आढळल्या. डोळे आणि थायरॉईडसंबंधी अनुक्रमे २.७ टक्के आणि ०.६ टक्के आढळून आले.

चाचण्यांमधील अन्य निरीक्षणे

  • सहभागींपैकी एक टक्का ‘एईएसआय’तील स्ट्रोक (०.३ टक्के) स्ट्रोक आणि स्नायूंमधील कमकुवतपणाची (०.१ टक्के) लक्षणे

  • किशोरवयीन, महिला आणि ॲलर्जी आणि लसीकरणानंतर टायफॉइड झालेल्यांना ‘एईएसआय’चा धोका अनुक्रमे १.६, २.८ आणि २.८ पटीने जास्त होता

  • कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर विकसित होणाऱ्या एईएसआय’ची लक्षणे वेगवेगळ्या वयोगटात वेगळी होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT