Assam Flood
Assam Flood Sakal
देश

आसाममधील पूरस्थिती गंभीरच

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी - ईशान्येकडी आसाम राज्यातील पूरस्थिती रविवारीही अत्यंत गंभीर होती. संततधार पावसामुळे अनेक नवीन भाग जलमय झाले. आसाममध्ये गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस व दरडींमुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील ३० लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. एकूण ११८ महसूल मंडळांचा समावेश असणाऱ्या ३२ जिल्ह्यांतील ४,२९१ गावांना पुराचा वेढा पडला आहे.

दरम्यान, पुरामुळे आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आसाममध्ये पूर व दरडीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ६२ वर गेली आहे. आसाममधील दिमा हसाओ, गोलपारा, कामरूप आदी जिल्ह्यांत नव्याने दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. शनिवारी (ता. १८) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसामची राजधानी गुवाहाटीत अक्षरश: हाहाकर उडाला. शहरातील अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले. काहीठिकाणी तर छातीइतक्या उंचीपर्यंत पाणी साचले होते.

गुवाहाटी महापालिकेचे आयुक्त देवाशिष शर्मा यांनी सांगितले, की अप्पर आसाममधील मुसळधार पाऊस व ब्रम्हपुत्रा नदीतील अतिरिक्त पाण्यामुळे गुवाहाटीत ब्रम्हपुत्रेच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. नदीचे गुवाहाटीत येणारे पाणी रोखण्यासाठी प्रशासनाने ब्रम्हपुत्रेची उपनदी भारलूवरील दारे बंद केली.

मदत छावण्यांमध्ये आश्रय न घेतलेल्या लोकांनाही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी, ३०२ मदत केंद्रे तात्पुरत्या स्वरुपात सुरू करण्यात आली आहेत, अशी माहीती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार: उद्धव ठाकरे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

SCROLL FOR NEXT