कुपवाडात BJP नेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात SPO शस्त्रांसह बेपत्ता! esakal
देश

कुपवाडात BJP नेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात SPO शस्त्रांसह बेपत्ता!

भाजप नेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात एसपीओ शस्त्रांसह बेपत्ता! कुपवाडात अलर्ट जारी

सकाळ वृत्तसेवा

उत्तर काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात भाजप नेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक विशेष पोलिस अधिकारी शस्त्रांसह बेपत्ता झाला आहे.

उत्तर काश्‍मीरमधील (North Kashmir) कुपवाडा (Kupwara) जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक विशेष पोलिस अधिकारी (Special Police Officer - SPO) शस्त्रांसह (Weapons) बेपत्ता झाला आहे. अधिकृत सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, काल (रविवारी) रात्री उशिरा बोहिपोरा (Bohipora) येथील रहिवासी एसपीओ साकिब तांत्रे (Saqib Tantre) जे स्थानिक भाजप नेते रशीद जरगर (Rashid Zargar) यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) म्हणून नियुक्त होते ते त्यांच्या घरातून दोन शस्त्रांसह बेपत्ता (Missing) झाले आहेत. (The SPO deployed for the security of the BJP leader in Kupwara went missing with weapons)

सूत्रांनी सांगितले की, बेपत्ता एसपीओ सोबत त्याचा आणखी एक सहकारी, जो बोहिपोरा येथील रहिवासी आहे, तो देखील फरार आहे. या दोघांचा शोध घेण्यासाठी परिसरात अलर्ट (Alert) जारी करण्यात आला आहे.

काही स्थानिक मीडिया रिपोर्टसनुसार, साकिब आणि त्याचा सहकारी 12 आणि 13 डिसेंबरच्या मध्यरात्री बेपत्ता झाला. दरम्यान, साकिबच्या कुटुंबीयांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

या प्रकरणाची पुष्टी करताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, लवकरच अधिक माहिती दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT