Statues of Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Gandhi, and Dr. Babasaheb Ambedkar have just been removed from their places of prominence in front of the Parliament House.  Esakal
देश

Shivaji Maharaj Statue: महाराष्ट्राने मते न दिल्याने संसदेतील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप

Parliament Building: या प्रकरणाबाबतची संपूर्ण माहिती अजून समोर आलेली नाही. त्यामुळे यावरून मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

आशुतोष मसगौंडे

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे संसद भवनासमोरील महत्त्वाच्या ठिकाणांहून नुकतेच हटवण्यात आले आहेत. याची माहीती माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लँडस्केपिंगचा भाग म्हणून पुतळे त्यांच्या मूळ ठिकाणाहून हलवण्यात आले आहेत. आदिवासी नेते बिरसा मुंडा आणि महाराणा प्रताप यांचे पुतळेही जुनी संसद भवन आणि संसदेच्या वाचनालयादरम्यानच्या लॉनमध्ये हलवण्यात आले आहेत. सर्व पुतळे आता त्याच ठिकाणी आहेत.

काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही या निर्णयावर जोरदार टीका केली आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाशी याला जोडले.

“जेव्हा अयोध्येत भाजपचा पराभव झाला, तेव्हा हे लोक रामभक्तांना शिव्या देऊ लागले. महाराष्ट्राच्या मतदारांनी भाजपला मतदान न केल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हटवण्यात आले. गुजरातमध्ये 26/26 जागा न मिळाल्याने त्यांनी संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा मूळ जागेवरून हटवला. जरा विचार करा, जर त्यांना 400 जागा मिळाल्या असत्या तर त्यांनी संविधान वाचवले असते का? खेरा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला जोरदार फटका बसला आहे. गेल्या वेळी 303 जागा जिंकलेला भाजप यावेळी 240 जागांवर घसरली आहे. तर दुसरीकडे गेल्या दोन निवडणुकीत 50 पेक्षा कमी जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यंदा 99 जागा जिंकल्या आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपसह महायुतीला दणका देत 30 जागा जिंकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

Mumbai Goa Highway Traffic Jam Update : झाली दिवाळी! परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा....

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

SCROLL FOR NEXT