Hijab Ban sakal
देश

Hijab Ban : हिजाब बंदी प्रकरणी आज सुनावणी

मुंबईच्या महाविद्यालयातील हिजाब बंदीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (ता.९) सुनावणी होणार आहे. चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन.जी.आचार्य आणि डी.के. मराठे महाविद्यालयात हिजाब आणि बुरखा घालून येण्यास संस्थेने प्रतिबंध घातला आहे. याला आक्षेप घेत काही विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मुंबईच्या महाविद्यालयातील हिजाब बंदीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (ता.९) सुनावणी होणार आहे. चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन.जी.आचार्य आणि डी.के. मराठे महाविद्यालयात हिजाब आणि बुरखा घालून येण्यास संस्थेने प्रतिबंध घातला आहे. याला आक्षेप घेत काही विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांची याचिका फेटाळली गेल्यानंतर नऊ विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून हिजाब, नकाब, बुरखा, स्टोल तसेच टोपी परिधान करुन येण्यास प्रतिबंध घातला होता. महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय धर्माचे पालन करण्याचा मुलभूत अधिकार तसेच गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ॲड. ए. झैदी हे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणार आहेत.

ठोस निकाल नाही

शिक्षण संस्थांतील हिजाब बंदीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने अद्यापपर्यंत ठोस निकाल दिलेला नाही. वर्ष २०२२ मध्ये कर्नाटकातील एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यावेळी दोन न्यायमूर्तींनी वेगवेगळा निकाल दिला होता.

हिजाब, नकाब, बुरखा परिधान करण्यास प्रतिबंध घालण्यात आल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम १९ (१) चे तसेच कलम २५ चे उल्लंघन होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji University Vice Chancellor : शिवाजी विद्यापिठाला तब्बल ९ महिन्यांनी कुलगुरू पद मिळालं; राज्यपालांकडून नियुक्ती

Pashan Lake Suspension Rollback: पाषाण तलाव प्रकरणासह पाच अधिकाऱ्यांचे निलंबन मागे; विभागीय चौकशी रद्द करून केवळ बदलीवर समाधान

Latest Marathi News Live Update : बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

'ठरलं तर मग'मधून जुन्या साक्षी शिखरेची एक्झिट; तिच्याजागी मालिकेत दिसणार नवी अभिनेत्री, हे आहे कारण

Pune Solapur Accident: लोणी काळभोरमध्ये गॅस टँकरची दुचाकीला धडक; तानाजी काळभोर यांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT