pm kisan sanman.jpg esakal
देश

'PM किसान'चा दहावा हप्ता मिळणार 16 डिसेंबरला?

'PM किसान'चा दहावा हप्ता मिळणार 16 डिसेंबरला?

सकाळ वृत्तसेवा

PM किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता कधी येणार? आजकाल खेड्यापाड्यात, चहा-पानाच्या दुकानात शेतकऱ्यांमधील ही चर्चा सर्रास ऐकू येत आहे.

PM किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) 10 वा हप्ता कधी येणार? आजकाल खेड्यापाड्यात, चहा-पानाच्या दुकानात शेतकऱ्यांमधील (Farmers) ही चर्चा सर्रास ऐकू येत आहे. पूर्वी लोकांना वाटत होते की डिसेंबर-मार्चचा हप्ता 15 डिसेंबरला येईल, परंतु आतापर्यंत FTO जनरेट न झाल्यामुळे प्रकरण प्रलंबित आहे. त्याच वेळी, आता अशी अटकळ बांधली जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 16 डिसेंबरला 10 वा हप्ता रिलीज करू शकतात. (The tenth installment of PM Kisan Samman Nidhi is likely to be collected on 16th December)

या अटकळीमागे एक कारण आहे. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निर्णयांनी लोकांना आश्‍चर्यचकित करतात. ते 16 डिसेंबर रोजी गुजरात सरकारने नैसर्गिक शेती पद्धती 'ऑनलाइन' आयोजित केलेल्या कृषी कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला संबोधित करतील. या कार्यक्रमात सुमारे 5,000 शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत पीएम किसान सन्मान निधीचे पैसे गुरुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही तारीख निश्‍चित केलेली नाही.

गेल्या वर्षी 25 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले होते. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18 हजार कोटी रुपये जारी केले. पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणून 18 हजार कोटी रुपये देशातील नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले. यानंतर 31 मार्च 2021 पर्यंत या हप्त्याअंतर्गत 10,23,49,443 लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार (Central Government) दरवर्षी 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये थेट ट्रान्सफर करते. आतापर्यंत सरकारने 9 हप्ते जारी केले असून 12 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकरी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ई-केवायसी (e-KYC) करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT