Monsoon 
देश

मॉन्सूनचा पुढील प्रवास वेगाने होणार, कारण...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवासास पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरापर्यंत हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवास वेगाने होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.(The travel of southwest monsoon creates a conducive environment)

बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळात ओडिशा, पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्यावर धडकेल. या वादळामुळे बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा जोर वाढला आहे. सद्यःस्थितीत श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर मॉन्सून दाखल झाला आहे.

सामान्यतः केरळमध्ये एक जूनला मॉन्सून दाखल होतो. यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे आणि आता पाठोपाठ बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची गती वाढली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिली.

महाराष्ट्रात दरवर्षी सह जूनच्या दरम्यान मॉन्सून तळ कोकणात हजेरी लावतो. यंदा नियमित वेळेच्या आधी बरसेल, असेही काही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

अरबी समुद्रातील चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरात दुसरे चक्रीवादळ तयार होत होते. तेथे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे रूपांतर आता तीव्र चक्रीवादळ होत आहे. त्यामुळे ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतील. या किनारपट्टीवर प्रतितास ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सोमवारी (ता. २४) सायंकाळपर्यंत त्याचा वेग ११० किलोमीटर जाईल. मंगळवारी चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाऊन ताशी १७० किलोमीटरपर्यंत, तर बुधवारी ताशी १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हे कमी दाबाचे क्षेत्र अंदमानातील पोर्ट ब्लेअरपासून उत्तरेकडे ५६० किलोमीटर, ओडिशातील पॅरादीपपासून आग्नेयेकडे ५९० किलोमीटर, बलासोरेपासून आग्नेयेकडे ६९० किलोमीटर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किलोमीटर अंतरावर होते. या चक्रीवादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे दोन ते तीन दिवस कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच किनारी भागातही राहू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

SCROLL FOR NEXT