Crime News Tripura Esakal
देश

Sons Killed Mother: देश हादरवणारी घटना! दोन मुलांनी मिळून आईला झाडाला बांधले अन् जिवंत जाळले

Tripura Crime News: त्रिपुरामध्येच गेल्या वर्षी एका 40 वर्षांच्या महिलेने आपल्या दोन मुलांना विष पाजून मारले होते. त्यानंतर या महिलेनेही जीवन संपवले होते.

आशुतोष मसगौंडे

दोन मुलांनी 62 वर्षीय आईला झाडाला बांधून कथितरित्या जिवंत जाळून टाकल्याची घटना पश्चिम त्रिपुरामध्ये घडली आहे. पोलीसांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. आरोपी मुलांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून हा गुन्हा घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चंपकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबरबारी येथे शनिवारी रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेल्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ती आपल्या दोन मुलांसह राहत होती. तर त्यांचा तिसरा मुलगा आगरतळा येथे राहतो.

जिरानियाचे उपविभागीय पोलीस आयुक्त कमल कृष्ण कोलोई यांनी सांगितले की, “एका महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाडाला बांधलेला जळालेला मृतदेह बाहेर काढला."

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "आम्ही पीडित महिलेल्या दोन मुलांना या प्रकरणात त्यांच्या कथित सहभागासाठी अटक केली आहे. आरोपींंना आज (सोमवारी) न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील चौकशीसाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे."

दरम्यान गेल्या काही काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील काही घटनांमध्ये मुलांनी आई-वडिलांवर हल्ले केले आहेत. तर काही घटनांनामध्ये पालकांनी मुलांचे जीव घेतले आहेत.

त्रिपुरामध्येच गेल्या वर्षी एका 40 वर्षांच्या महिलेने आपल्या दोन मुलांना विष पाजून मारले होते. त्यानंतर या महिलेनेही जीवन संपवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT