Ayodhya  sakal
देश

Ayodhya : तडजोडीसाठी काही जणांकडून दबाव ; पीडितेच्या आईने बसपच्या शिष्टमंडळाकडे तक्रार केल्याचा दावा

अयोध्येमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी तडजोड करून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात येत असल्याची माहिती पीडितेच्या आईने दिल्याचा दावा बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्यांनी केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अयोध्या : अयोध्येमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी तडजोड करून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात येत असल्याची माहिती पीडितेच्या आईने दिल्याचा दावा बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्यांनी केला आहे.

‘बसप’चे नेते विश्‍वनाथ पाल यांच्यासह पक्षाच्या एका शिष्टमंडळाने शनिवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडितेच्या आईने ‘‘आमच्यावर तडजोड करण्यासाठी दबाव येत आहे, ’’ असे शिष्टमंडळाला सांगितल्याचा दावा विश्‍वनाथ पाल यांनी केला आहे. मात्र त्यांच्यावर कोण दबाव आणत आहेत याची माहिती विश्‍वनाथ यांनी दिलेली नाही. न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे असून, त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडण्याची गरज नाही, असे आश्वासन पीडितेच्या कुटुंबीयांना दिल्याचे विश्‍वनाथ यांनी सांगितले. दरम्यान, बसपच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडितेचीही भेट घेतली.

अयोध्या पोलिसांनी ३० जुलै रोजी येथे बेकरी चालविणाऱ्या मोईद खान आणि त्याचा नोकर राजू खान या दोघांना एका अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केली. या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी या मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याचे तिच्या पालकांना लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली.

आरोपी ‘सप’चा नेता?

अयोध्येतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मोईद खान हा समाजवादी पक्षाचा (सप) कार्यकर्ता असून तो अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्या प्रचारात सक्रिय होता, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. तर याप्रकरणी ‘डीएनए’चाचणी करावी अशी मागणी ‘सप’च्या वतीने करण्यात आली आहे. बसपचे नेते विश्‍वनाथ पाल यांनी मात्र याप्रकरणी पीडितेची साक्ष पुरेशी असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी समाजवादी पक्षावर देखील जोरदार टीका केली आहे.

मागील दोन महिन्यांपासून पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले, मात्र बसपच्या शिष्टमंडळाने पीडितेची भेट घेतल्यानंतर प्रशासनाने तिच्या तक्रारीची दखल घेतली असा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी हा ‘सप’चा शहर प्रमुख असल्याने ‘सप’कडून त्याला वाचविण्यात येत आहे, असा आरोपही विश्‍वनाथ यांनी केला. त्याचप्रमाणे यामध्ये राजकारण आणू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

भाजपच्या शिष्टमंडळानेही घेतली भेट

भाजपच्या शिष्टमंडळाने अयोध्येतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेत सविस्तर चर्चा केली. या समितीने पीडितेच्या कुटुंबीयांकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. याप्रकरणी एक अहवाल तयार करून तो पक्षाचे ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. लक्ष्मण यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. भाजपच्या तीन सदस्यांच्या या समितीमध्ये राज्यसभेच्या खासदार संगीता बलवंत बिंद आणि उत्तर प्रदेशचे मागासवर्ग कल्याण विभागाचे राज्यमंत्री नरेंद्र कश्‍यप आणि बाबूराम निषाद यांचा समावेश होता. या भेटीबाबत बोलताना बाबूराम निषाद म्हणाले, ‘‘आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून याप्रकरणी सखोल तपास केला जाईल तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यात येईल.’’ योगी आदित्यनाथ यांनीही मागील आठवड्यात पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत, प्रशासनाच्या वतीने याप्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते.

आरोपीची बेकरी पाडली

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मोईद खान याची बेकरी स्थानिक प्रशासनाच्या वतीने शनिवारी पाडण्यात आली. या बेकरीचे बांधण्यात बेकायदा होते असा दावा अयोध्येचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रविजय सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंना मुंबई सोडावी लागणार? पोलिसांनी पाठवली नोटीस, कोर्टात दुपारी महत्त्वाची सुनावणी

Kolhapur Firing News : बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून मेहुण्याला गोळी घातली, घटनेतील मुख्य कारण आलं समोर

OBC Reservation: उद्यापासून ओबीसी संघटनांचे ‘इशारा आंदोलन’; आरक्षणाच्या संरक्षणासाठी नागपूर विभागात आंदोलन होणार

Pune Road Accident : पुण्यात भीषण अपघात; सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच मृत्यू; अंगावरून चाक गेलं अन्...

Nestle CEO: ऑफिसमध्ये CEOचे ज्युनियर सोबत अफेअर; मोजावी लागली मोठी किंमत, 913 कोटींची नोकरी गमावली

SCROLL FOR NEXT