Ancient Bahubali idol esakal
देश

खानापूर तालुक्यात पुरातन काळातील जैन तीर्थंकर बाहुबली मूर्तीची चोरी; ग्रामस्थ आक्रमक, जमीन मालकावर संशय

Ancient Bahubali idol : मूर्तीच्या चोरी प्रकरणावरून गावात नाराजी निर्माण झाल्याने संपूर्ण गावाने सोमवारी दिवसभर नंदगड पोलिस ठाण्यात (Nandgad Police Station) ठाण मांडले होते.

सकाळ डिजिटल टीम

बिडीजवळील गोलिहळी येथील शंकर गोळेकर व त्यांचे बंधू बसप्पा गोळेकर यांनी जमिनीवर प्लॉट पाडून ती विकण्याचा प्रयत्न केला.

खानापूर : खानापूर तालुक्यातील बिडीनजीक गोलिहळी येथे गावठाण जमिनीत असलेल्या जैन तीर्थंकर बाहुबलीची (Bahubali) पुरातन काळातील मूर्ती चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. या घटनेबाबत नंदगड पोलिस स्थानकात जमीन मालकाविरोधात तक्रार दाखल करून कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी शोध घेऊन त्या मूर्ती घेऊन गेलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.

पण, मूर्तीच्या चोरी प्रकरणावरून गावात नाराजी निर्माण झाल्याने संपूर्ण गावाने सोमवारी दिवसभर नंदगड पोलिस ठाण्यात (Nandgad Police Station) ठाण मांडले होते. प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिडीजवळील गोलिहळी येथील शंकर गोळेकर व त्यांचे बंधू बसप्पा गोळेकर यांनी जमिनीवर प्लॉट पाडून ती विकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी पूर्वीपासून काही जमिनीत स्मशानभूमी व काही जमिनीत पुरातन काळापासून बाहुबलीची मूर्ती असल्याने त्या जमिनीतील प्लॉट विक्री होत नव्हती.

त्या ठिकाणी असलेली पुरातन बाहुबलीची मूर्ती अज्ञात व्यक्ती एका गाडीतून घेऊन जाताना शाळकरी मुलांनी पाहिले होते. ते समजल्यावर ग्रामस्थांत एकच असंतोष निर्माण झाला. त्या मूर्ती घेऊन गेलेल्या वाहनाचा शोध घेऊन ग्रामस्थांनी पोलिस ठाणे गाठले. त्या वाहन चालकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. संबधितावर ठोस कारवाई करण्यात यावी व मुर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करावी, अशी मागणी करत प्रमुख नागरिक शिवाजी ईश्वर गुरव, इराप्पा सात्ताणावर, महेश कुणकीकोप, उमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोमवारी रात्री उशिरापर्यंत नंदगड पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT