Manoranjan D 
देश

Manoranjan D: "...तर त्याला फाशी द्या"; संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाच्या वडिलांची कडवी प्रतिक्रिया

सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेच्या गॅलरीत प्रवेश करणाऱ्या आणि तिथून सभागृहात उतरुन दोन तरुणांनी गोंधळ घातला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बंगळुरु : संसदेत सुरक्षा व्यवस्था भेदून गॅलरीत प्रवेश करणाऱ्या आणि तिथून थेट लोकसभेच्या सभागृहात उतरुन गोंधळ माजवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यांपैकी एकाच नाव मनोरंजन देवराज असं असून तो कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहे.

याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं असून यावर आता त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मुलानं जर काही चुकीचं केलं असेल तर त्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. (Then hang him reaction of father of Manoranjan Devraj who caused chaos in Parliament)

जर समाजाला हानी...

मनोरंजनचे वडील दिवराज यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटलं की, "जर माझ्या मुलानं काही चुकीचं केलं असेल तर निर्विवादपणे मी त्याचं समर्थन करतो. पण जर त्यानं काही चुकीचं केलं असेल तर त्याचा मी निषेध करतो. तसेच जर त्यानं समाजाला हानी पोहोचेल असं काही चुकीचं केलं असेल तर त्याला दिली जावी" (Latest Marathi News)

कोण आहे मनोरंजन डी.

मनोरंजन डी हा ३५ वर्षीय युवक असून म्हैसूरचा रहिवासी आहे. त्यांनं कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. बंगळुरुच्या विवेकानंद विद्यापीठातून त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सहा जणांचा सहभाग

दरम्यान, संसदेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या घटनेची सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकारात ६ जणांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या घरी जाऊन आता सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. पण तत्पूर्वी मीडियाच त्यांच्या घरापर्यंत पोहोचला असून त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींकडं या मुलांच्या कामांबाबत आणि त्यांच्या स्वभावाबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मनोरंजनसह सागर शर्मा, नीलम, अमोल शिंदे आणि इतर दोन जण सहभागी आहेत. यांपैकी अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT