देश

सावंत सरकारला पाठिंबा देण्यावरून मतभेद तीव्र

अवित बगळे

पणजी : गोवा विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत सरकारने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला असला तरी यानिमित्ताने सरकारला पाठिंबा देण्यावरून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात फूट पडल्याचे दिसून आले. पक्षाचे आमदार दीपक पाऊसकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी परस्परविरोधी माहिती देत या सारेकाही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत. 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आमदार आहेत. त्यापैकी मनोहर आजगावकर आणि पाऊसकर हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र, भाजपने घटक पक्ष अस्थिर करणार नाही, अशी भूमिका घेत ही शक्‍यता फेटाळली होती. ढवळीकर हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले होते. सरकारला पाठिंबा देणारे पक्षाचे पत्र त्यांच्याकडेच होते. ते त्या पत्रासह गायब झाल्याने शपथविधी लांबला आणि अखेर तो उत्तररात्री करावा लागला होता.

पाऊसकर यांनीच ही बाब आज पत्रकारांशी बोलताना उघड केली. ते म्हणाले, मगोच्या केंद्रीय समितीने घेतलेला ठराव घेऊन ढवळीकर निघून गेले. ते बराच वेळ कुठे आहेत हे समजून आले नाही. तोवर शपथविधीची वेळ झाली आणि पक्षाला तीन मंत्रिपदे मिळालीच नाही.

मात्र, ढवळीकर यांनी सांगितले, की मगोच्या केंद्रीय समितीने तीन मंत्रिपदे व महामंडळाची तीन अध्यक्षपदे मिळावीत, असा ठराव घेतला खरा मात्र त्यावर दोन आमदारांच्या स्वाक्षऱ्या केल्याच नाहीत. त्यामुळे तो ठराव भाजपच्या नेत्यांकडे देण्याचा प्रश्‍नच येत नव्हता. ते दोन आमदारच त्या ठिकाणी नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT