Yoga Guru Baba Ramdev esakal
देश

Baba Ramdev : स्त्री-पुरुष असा भेदभाव कधीच नव्हता; महिलांबाबत वादग्रस्त बोलणाऱ्या बाबा रामदेवांचा यू-टर्न?

महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही छान दिसतात, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही छान दिसतात, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.

जयपूर : योगगुरू बाबा रामदेव (Yoga Guru Baba Ramdev) नेहमी आपल्या योगासनांमुळं किंवा पतंजली कंपनीबाबतच्या बातम्यांमुळं चर्चेत असतात. त्यासोबतच काही वेळा ते आपल्या वक्तव्यांमुळंही चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच त्यांनी ठाण्यात महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलत असताना बाबा रामदेव म्हणाले, महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही (पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेनं पाहिलं तर, काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आता योगगुरू बाबा रामदेव यांनी देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी केलीय.

राजस्थानची राजधानी जयपूर इथं झालेल्या अभाविपच्या राष्ट्रीय अधिवेशनात (National Convention of ABVP) बाबा रामदेव यांनी ही मागणी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 68 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन करताना रामदेव म्हणाले, भारताला आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध व्हायचं आहे. भारतात जन्माला येऊन काही लोक कम्युनिस्ट समाजवादाच्या बाता करतात. त्या कम्युनिस्टांनी चीन आणि उत्तर कोरियात जावं, असं त्यांनी सांगितलं.

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी करताना बाबा रामदेव म्हणाले, भारतीय संस्कृतीत जातीच्या आधारावर कधीही भेदभाव केला गेला नाही. स्त्री-पुरुष असा भेदभाव कधीच नव्हता. कधीही मोठं होण्याचा विचार करू नका, तर मोठं करण्याचा विचार करा. अभाविपच्या कार्यकर्त्यांना यशाचा मंत्र देत ते म्हणाले, वेळेत काम करणं हे यशाचं सर्वात मोठं सूत्र आहे.

बाबा रामदेव पुढं म्हणाले, भविष्यात 5 लाख कोटींचं आर्थिक साम्राज्य उभं करायचं आहे. देवाच्या नियमांचं कधीही उल्लंघन करू नका. संविधानावर विश्वास असणं आवश्यक आहे. असं काम कधीही करू नका, त्यामुळं तुमची प्रतिमा खराब होईल. भारतानं संपूर्ण जगाचं नेतृत्व करावं, ही जबाबदारी घेण्याची क्षमता केवळ अभाविपमध्ये असल्याचं ते म्हणाले. आम्हा भारतीयांचे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याशी रक्ताचं नातं आहे. आम्ही ऋषी-मुनी, विद्वान आणि महान पराक्रमी लोकांची मुलं आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT