NCC esakal
देश

NCC : राष्ट्रीय छात्र सेनेत तीन लाख जागांची होणार वाढ; संरक्षमंत्र्यांकडून ‘एनसीसी’च्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार एनसीसी हा एक निवडक विषय म्हणून उपलब्ध करण्यात आला आहे

सकाळ डिजिटल टीम

बागडोगरा : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विस्ताराच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी देत छात्रांच्या भरतीसाठी तीन लाख जागांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता एनसीसीतील छात्रांची संख्या २० लाखापर्यंत वाढेल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार एनसीसी हा एक निवडक विषय म्हणून उपलब्ध करण्यात आला आहे. दरम्यान या विस्तारामुळे देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील एनसीसीची वाढती मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात आली असून यामुळे एनसीसी ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना ठरेल. एक परिवर्तनात्मक प्रभाव पाडणे, तसेच युवक राष्ट्र उभारणीत सार्थ योगदान देतील असे वातावरण निर्माण करणे हे ‘एनसीसी’चे मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम 'विकसित भारत'चे ध्येय साध्य करण्यासाठी योगदान देणाऱ्या 'अमृत पिढी'च्या प्रेरक, शिस्तप्रिय आणि देशभक्त तरुणांचा पाया रचणार आहे. देशाचे भावी नेतृत्व म्हणून निर्णायक भूमिका बजावण्याच्या दिशेने तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हा विस्तार एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे.

निर्णयामुळे फायदे :

- रिक्त जागांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना एनसीसीमध्ये सहभाग घेता येईल

- या विस्तारामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिक्त पदांचे योग्य प्रमाणात वितरण होईल

- एनसीसीसाठी इच्छुक संस्थांची प्रतीक्षा यादी कमी होईल

- विस्तार योजनेत चार नवीन गट मुख्यालयांची स्थापना व दोन नवीन एनसीसी युनिट्स समाविष्ट करण्याचा उद्देश

- तसेच यामध्ये माजी सैनिकांना एनसीसी प्रशिक्षक म्हणून नोकरी देण्याचा प्रस्ताव आहे

- त्यांच्या कौशल्यांचा आणि मोठ्या अनुभवाचा फायदा

- या उपक्रमामुळे एनसीसीच्या छात्रांना दर्जेदार प्रशिक्षण तर, माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhim Jayanti: आमचा वर्षात एकच उत्सव... नियम का? भीम जयंतीत DJ बंदीवरून वरळीत नागरिक-पोलिस आमनेसामने; काय घडलं?

Pune Sound Pollution : ससून रुग्णालयासारख्या शांतता क्षेत्रात डीजेचा दणदणाट; उच्च न्यायालयात मागणार दाद

Mumbai AC Local : मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी एसी लोकल धावण्यासाठी सज्ज: हार्बरवर १४ फेऱ्या वाढणार

Latest Marathi News Update: पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'च्या नाकेबंदीच्या मुद्द्यावर चर्चा

Pune Drugs : खराडी, हडपसर परिसरात ‘एमडी’ ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक

SCROLL FOR NEXT