देश

'अमित शहांशी झालेल्या बैठकीतून गोव्यासाठी नवी सुरवात'

प्रशांत शेट्ये

मडगाव : 'भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीतून गोव्याच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने नवी सुरवात होत असल्याचा संदेश मिळाला आहे', असे सूचक वक्तव्य नगरनियोजन मंत्री आणि भाजपप्रणित युती सरकारमधील गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले. 'मगो'चे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर यांच्याविषयीही सरदेसाई यांनी गौरवोद्गार काढून गोवा सरकारच्या नेतृत्त्वासंदर्भातील निर्णयात घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल, असेही स्पष्ट केले आहे. 

ढवळीकर यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची गुरूवारी दिल्लीत बैठक झाली. युतीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या दोन्ही नेत्यांशी शहा यांनी केलेली चर्चा ही गोव्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. 

'ही बैठक चांगली झाली. राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन सुरवातीचा संदेश यातून मिळाला आहे', असे सरदेसाई यांनी सांगितले. 'ढवळीकर हे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांचे ज्येष्ठत्त्व कुणीही नाकारू शकत नाही', असे विधानही त्यांनी केले. माडेल-फातोर्डा येथील एका नाल्याच्या बांधकामाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीमुळे गोव्यात खांदेपालटाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने सभापती डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे नाव पुढे केल्यास गोवा फॉरवर्डची भूमिका काय असेल, असा प्रश्‍न सरदेसाई यांना विचारण्यात आला. त्यावर 'भाजप आधी काय करणार आहे, ते पाहू' असे ते म्हणाले. 

'भिन्न प्रकृतीच्या घटकाचा समावेश असल्याने आगळ्या पद्धतीच्या भाजप-मगो व गोवा फॉरवर्डच्या युतीची आणि गोव्यातील राजकीय स्थितीची शहा यांना नेमकी जाण आहे. ही युती पर्रीकर आणि घटक पक्षांमध्ये असून त्यांचा आदर करण्याची गरज आहे', असेही सरदेसाई म्हणाले. 

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मगो व गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी एकमेकांना टीकेचे लक्ष्य केले होते. पर्रीकर यांच्या आजारपणामुळे नेतृत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा ढवळीकर यांच्याकडे नेतृत्त्व सोपविले जाऊ नये, यासाठी सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डमधील दोन सहकारी मंत्री आणि तीन अपक्षांसह आघाडी उघडली होती. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची एकत्र भेट घेऊन त्यांनी ढवळीकर यांच्या नावास विरोध केला होता. पण कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील समीकरणे बदलली आणि त्यात या दोन्ही घटक पक्षांनी मतभेद बाजूला सारत जवळीक साधल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

Sambhaji Maharaj Descendants : शंभूराजांच्या आजोळ घराण्याचे वंशज काय करतात? छत्रपतींशी पिढ्यानपिढ्या जपले आहे रक्ताचे नाते

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

SCROLL FOR NEXT