farmer 
देश

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

कार्तिक पुजारी

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत शेतातील तण जाळणाऱ्यांवर (farmers for burning stubble) कायदेशीर कारवाईपासून सूट दिली आहे. याआधी राष्ट्रीय राजधानी आणि सलग्न भागातील वायू प्रदुषण रोखण्यासाठी यासंबंधी कायदेशीर कारवाईचा आदेश काढण्यात आला होता.

नवी दिल्ली- सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत शेतातील तण जाळणाऱ्यांवर (farmers for burning stubble) कायदेशीर कारवाईपासून सूट दिली आहे. याआधी राष्ट्रीय राजधानी आणि सलग्न भागातील वायू प्रदुषण रोखण्यासाठी यासंबंधी कायदेशीर कारवाईचा आदेश काढण्यात आला होता. पण, गुरुवारी संससेत विधेयक सादर (parliament approves bill) करुन ही तरतूद काढण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि परिसरातील वायु प्रदुषणासंबंधी विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा दिलासा आहे. (National Latest Marathi News)

संसदेत चर्चेला उत्तर देताना पर्यावरण आणि क्यायमेंट चेंज मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, दीपेंद्र हुड्डा यांनी विधेयकाच्या कलम १५ वर चिंता व्यक्य केली आहे. पण, कलम १४ मध्ये स्पष्ट करण्यात आलंय की तण जाळणे गुन्हेगारी कृतीच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे तण जाळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार नाही. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी या तरतूदीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सरकारने ही तरतूद हटवली आहे.

भूपेंद्र यादव म्हणाले की, 'दिल्लीमध्ये मागील काही वर्षात वायू प्रदुषण वाढण्यासाठी वाहनांची संख्या वाढणे, औद्योगिक प्रदूषण आणि जैविक कचरा जाळणे याचा समावेश आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एका आयोगाची आवश्यकता आहे. या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आले आहे. यात पर्यावरण तज्ज्ञ आणि एनसीआरच्या भागातील लोकांचाही सहभाग असेल. सरकार पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रतिबद्ध आहे.'

यादव पुढे म्हणाले की, एनसीआर भागात प्रदुषणाच्या क्षेत्रांचा शोध घेणे आवश्यक आहे. आपल्याला अशी व्यवस्था हवी ज्यात समन्वय आणि समाधान असायला हवे. आयोगात शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व असेल. विधेयकाद्वारे आम्ही संपूर्ण संसदे प्रती उत्तरदायी असू आणि आयोगाचा रिपोर्ट दरवर्षी संसदेत सादर केला जाईल. देशातील सर्व शहरात वायू प्रदुषणाचे मापन करण्यासाठी विविध भागात यंत्र लावण्यात येतील. यासाठी लक्ष्य निश्चित करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जामडी गावात माजी सरपंचाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT