Ibrahim Raisi 
देश

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

त्यामुळं उद्या देशभरात भारताचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं भारतात उद्या (२१ मे) एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं उद्या देशभरात भारताचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. (there will be one days state mourning on 21st May throughout india due to death of Iran President Ebrahim Raisi)

केंद्रीय गृहखात्यानं याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटलं की, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुःखद प्रसंगी दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारनं उद्या २१ मे रोजी एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

या दुखवट्याच्या दिवशी ज्या सरकारी इमारतींवर नेहमी राष्ट्रध्वज फडकावला जातो तिथं राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाईल. तसेच या दिवशी कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत, असंही गृहखात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.

रविवारी खराब हवामानामुळं इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम राबवण्यात आली. त्यानंतर सोमवारी इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. रईसी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियन यांचाही मृत्यू झाला आहे. वरझाघन शहराजवळील डिझमारच्या डोंगराळ जंगलात हा अपघात झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गिरणी कामगारांना हक्काचे घरं नाहीचं, सरकारकडून पुन्हा मुंबईतील घरांचे गाजर

Mini Maldives: लाखोंचा खर्च कशाला? भारतात दडलाय 'मिनी मालदीव'; हे निसर्गरम्य ठिकाण पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

कागदपत्र देण्याच्या बहाण्याने स्पर्श अन् जवळीक! महिला पोलिसाचा विनयभंग, ASIवर गुन्हा दाखल

शरियाचा फायदा घेत मुस्लिमांना ३ हजार कोटींना फसवलं; नौहेरा शेखनं काय केलं? EDने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरच्या मॉकड्रिल दरम्यान हातात ग्रॅनेट फुटल्याने चार पोलीस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT