Rajasthan Election Esakal
देश

Rajasthan Election: राजस्थानातही होणार दोन उपमुख्यमंत्री? पक्षामध्ये हालचालींना वेग

राजस्थान विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

राजस्थान विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या श्रेष्ठींनी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्रिपदावर चर्चा करण्यासाठी राजस्थानमधील अनेक बड्या नेत्यांना पाचारण केले आहे.

सर्वात पहिले निमंत्रण अलवर जिल्ह्यातील तिजारा विधानसभा मतदारसंघात विजय नोंदविणारे खासदार बाबा बालकनाथ यांना दिले आहे. दरम्यान, भाजपच्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, बाबा बालकनाथ, विद्याधरनगर येथील दियाकुमारी, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, ओम माथूर, सुनील बन्सल आणि माजी सरचिटणीस प्रकाशचंद गुप्ता यांचा समावेश आहे.

खासदार बालकनाथ यांना दिल्लीत बोलावले आहे. त्यानंतर गजेंद्र सिंह शेखावत देखील दिल्लीत पोहचले आहेत. मात्र राजस्थानात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भाजपच्या श्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून तयारी सुरू केली आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यात चर्चा झाली आहे. या ठिकाणी नेता निवड आणि निरीक्षकांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांच्या नावावरून चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT