Global Family Day  esakal
देश

Global Family Day 2024 : जो आनंद एकत्र कुटूंब पद्धतीत आहे तो एकटं राहण्यात कसला? काय आहे ती खास गोष्ट

कुटुंब हा आपल्या जीवनाचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे. कुटुंब सोबत असेल तर आपण आयुष्यातील कोणत्याही संकटांना सहज तोंड देऊ शकतो.

Monika Lonkar –Kumbhar

Global Family Day 2024 : दरवर्षी १ जानेवारीला संपूर्ण जग नववर्षाचा आनंद साजरा करताना दिसतं. सगळीकडे नवीन वर्षाचा उत्साह आपल्याला पहायला मिळतो. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की दरवर्षी जगभरात १ जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल फॅमिली डे उत्साहात साजरा केला जातो.

संपूर्ण जगात शांतता स्थापित करणे आणि कुटुंबातील सदस्यांनी खेळीमेळीने एकत्र राहणे हा या दिनामागचा हेतू आहे. कुटुंब हा आपल्या जीवनाचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे. कुटुंब सोबत असेल तर आपण आयुष्यातील कोणत्याही संकटांना सहज तोंड देऊ शकतो.

आज या जागतिक कुटुंब दिनानिमित्त आपण कुटुंब सूखी राहण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत. ज्या टिप्सच्या मदतीने तुम्ही कुटुंबातील सदस्यांना आनंदित ठेवून तुमची फॅमिली हॅपी ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या टिप्स.

एकत्र जेवण करा

कुटुंबातील सदस्यांनी मिळून एकत्र जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत, असे आज ही म्हटले जाते. कुटुंबातील सदस्यांनी एकत्रपणे जेवण केल्याने कुटुंबात आनंद वाढतो. जेवण करण्याच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांसोबत संवाद होतो.

Family Dinner

दिवसभरातील कोणत्याही एका वेळी सर्व सदस्यांनी मिळून एकत्रितपणे जेवण करायला हवे. एकत्र जेवण करताना कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना त्यांचा आजचा दिवस कसा गेला? आज दिवसभरात काय घडले? याची विचारपूस करावी.

कुटुंबात लहान मुले असतील तर मुलांना त्यांच्या अभ्यासाबद्दल किंवा दिवसाबद्दल विचारा. कौटुंबिक विषयांवर बोलून चर्चा करा. यामुळे, कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांसोबत संवाद होतो आणि विचारपूस होते.

कौटुंबिक सहलीचे करा नियोजन

मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला तर सर्वजण जातात. मात्र, कुटुंबासोबत प्रवास करण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे, कौटुंबिक सहलीचे आवर्जून नियोजन करा. सर्वांच्या आवडीनिवडीनुसार ठिकाण ठरवा आणि फिरायला जा.

Family Vacation

या सहलीच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात, गप्पागोष्टी होतात. त्यामुळे, कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांप्रती जिव्हाळा वाढण्यास मदत होते. या सहलीच्या निमित्ताने नवीन ठिकाणाची भटकंती होते आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला जातो. विशेष म्हणजे, या कौटुंबिक सहलीच्या निमित्ताने अनेक आठवणींची शिदोरी तुम्ही सोबत घेऊन जाता.

काहीतरी नवे शिकण्याचा प्रयत्न करा

आयुष्यात काहीतरी नवीन शिकणे हे खूप महत्वाचे आहे. या नव्या गोष्टींमुळे आपल्या ज्ञानात तर भर पडतेच शिवाय, नवीन अनुभव देखील मिळतो. कुटुंबातील सदस्यांनी देखील नवीन गोष्टी शिकणे फार गरजेचे आहे.

जेव्हा तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत काहीतरी नवीन शिकता तेव्हा त्याची उत्सुकता आणि आनंद काहीतरी औरच असतो. रेसिपी बनवणे, कलाकुसर बनवणे, चित्रकला शिकणे आणि एखादी नवीन भाषा शिकणे इत्यादी गोष्टी तुम्ही एकत्रितपणे शिकू शकता. या गोष्टींमुळे कुटुंब तर मजबूत होतेच शिवाय, कुटुंबातील सदस्यांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी देखील मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT