Members of Parliament MPs were suspended 
देश

MP Suspended: विरोधी पक्षाच्या 33 खासदारांचे निलंबन; आतापर्यंत 47 जणांवर कारवाई

सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी ३३ विरोधक खासदारांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांचे निलंबन कायम असणार आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी ३३ विरोधक खासदारांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. संपूर्ण हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांचे निलंबन कायम असणार आहे.(Thirty three opposition Members of Parliament MPs were suspended from the Lok Sabha for the remainder of the Winter Session)

निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, डीएमकेचे टी आर बालू आणि दयानिधी मरन आणि टीमसीच्या सौगाता रॉय यांचा समावेश आहे. याआधी संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी लोकसभेचे तेरा आणि राज्यसभेच्या एका खासदाराचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे हिवाळी अधिनेशनात कारवाई झालेल्या खासदारांची एकूण संख्या ४७ झाली आहे.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, माझ्यासह ३३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आमची मागणी होती की संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या १४ खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी. मागील आठवड्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत येऊन सुरक्षेसंबंधी झालेल्या चुकीबाबत निवेदन सादर करावे अशी आमची मागणी होती. ते नेहमी टीव्हीवर बोलत असतात. मग त्यांनी संसदेतही थोडं बोलावं. सुरक्षेसंबंधी आतापर्यंत काय काराई केली हे सांगावं. या सरकारने मर्यादा ओलांडली आहे. आम्हाला केवळ चर्चा हवी होती, असं चौधरी म्हणाले.

के. जयकुमार, विजय वसंथ, अब्दुल खालिक यांच्यावर सभापतींच्या पोडियमवर चढल्याचा आरोप आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रस्तावानंतर खासदारांना निलंबित करण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT