amit shah_yogi 
देश

अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका, CRPF चा खळबळजनक दावा

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय राखीव पोलीस बलानं (CRPF) केला आहे. मुंबईतील सीआरपीएफच्या मुख्यालयात एक ई-मेल आला असून यामध्ये शहा आणि योगी यांना येत्या काळात जीवे मारण्यात येईल असं म्हटलं आहे. 

ई-मेल आल्यानंतर सीआरपीएफच्या कार्यालयात गोंधळ उडाला. या ई-मेलमध्ये म्हटलंय की, "एखाद्या धार्मिक स्थळी या दोन्ही नेत्यांवर हल्ला केला जाईल" या धमकीनंतर सीआरपीएफसहित इतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एएनआयनं याबाबत ट्वीट केलं असून मंगळवारी सीआरपीएफला मेल मिळाल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमित शहा यांना आली होती धमकी

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र मिळालं होतं.

योगींना अनेकदा मिळाली धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वी अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याच वर्षी जानेवारीमध्ये मुख्यमंत्री योगींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ११२ या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला होता. यामध्ये म्हटलं होतं की, "२४ तासांच्या आतमध्ये त्यांना मारण्यात येईल, शोधू शकणार असाल तर शोधा. एके ४७ ने चोवीस तासांच्या आतमध्ये त्यांना मारण्यात येईल." 

हा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला आग्र्याहून ताब्यातं घेतलं होतं, मात्र हा आरोपी अल्पवयीन होता. आयबीच्या अलर्टनंतर योगी आदित्यनाथ यांना सातत्याने मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT