esakal
देश

Rajouri Attack : राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, तीन जवान शहीद

काल संध्याकाळपासून या ठिकाणी लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात गुरुवारी दहशतवाद्यांनी लष्करी वाहनावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. तर इतर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला आपल्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. काल संध्याकाळपासून या ठिकाणी लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. (Three Army personnel lost their lives while three others were injured in a terrorist attack in Rajouri sector)

लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला

एएनआयच्या वृत्तानुसार, राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यावेळी आपल्या जवानांकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. काल संध्याकाळपासून या भागात सुरू असलेल्या दहशतवाद्यांविरोधात सैन्याच्या संयुक्त मोहिमेला बळ देण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवली होती. 48 राष्ट्रीय रायफल्सकडून या परिसरात सध्या शोधमोहिम सुरू आहे. (Marathi Tajya Batmya)

दोन वर्षात ३५ जवान शहीद झालेत

दरम्यान, गेल्या महिन्यात राजौरीतील कालाकोट इथं लष्कर आणि विशेष सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर दोन कॅप्टनसह सैनिक शहीद झाले होते. गेल्या दोन वर्षांत या प्रदेशात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 35 हून अधिक जवान शहीद झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील ऐतिहासिक विधि महाविद्यालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाचं उद्घाटन

SCROLL FOR NEXT