Challakere Motor Accident esakal
देश

Car Accident : कार अपघातात तीन बालकांसह चौघांचा मृत्यू; चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

चालक झोपेत असल्याने पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

दुसऱ्या एका घटनेत धारवाडमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. धारवाड तालुक्यातील हेब्बळ्ळी-तळवाई रस्त्यावर अपघात झाला.

बंगळूर : चळ्ळकेरेजवळ मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती एका पुलावर आदळली, यात तीन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा (Challakere Motor Accident) मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे हा अपघात घडला.

सिंधूश्री (वय २), अय्यळप्पा (वय ५ महिने), रक्षा (वय ३ महिने) आणि रायचूर जिल्ह्यातील देवदुर्गा तालुक्यातील दंडमहळ्ळी येथील लिंगप्पा (वय २६) हे मरण पावले. अपघातात जखमी झालेले यल्लम्मा (३०), मल्लम्मा (२०) आणि नागप्पा (३५) यांना चळ्ळकेरे तालुक्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. चालक झोपेत असल्याने पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वृत्त समजताच पीएसआय शिवराज यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चळ्ळकेरे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दुसऱ्या एका घटनेत धारवाडमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. धारवाड तालुक्यातील हेब्बळ्ळी-तळवाई रस्त्यावर अपघात झाला. तळवाई गावातील बसवराज जट्टानवर (वय ३२) हे मृत दुचाकीस्वार होते. हेबळी येथून घरी जात असताना हा अपघात झाला. धारवाड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT