Accident News Esakal
देश

Accident News: स्कूल व्हॅन आणि ट्रकच्या भीषण धडकेत तिघांचा मृत्यू; व्हॅन चालकासह दोन चिमुकल्यांचाही समावेश

Accident News: उत्तर प्रदेशातील बदायूं येथे स्कूल व्हॅन आणि ट्रक यांच्यात धडक झाली, ज्यात दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ९.४५ वाजता बरेली-मथुरा रस्त्यावर मुलांना शाळेत घेऊन जात असताना घडली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशातील बदायूं येथे स्कूल व्हॅन आणि ट्रकची भीषण धडक झाली, ज्यात तीन जणांना मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, आज(मंगळवारी) स्कूल व्हॅन आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली, ज्यामध्ये दोन मुले आणि चालकाचा मृत्यू झाला आहे.

ही घटना सकाळी ९.४५ वाजता बरेली-मथुरा रस्त्यावर मुलांना शाळेत घेऊन जात असताना घडली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, धडकेनंतर रोडवेज बसनेही व्हॅनला पाठीमागून धडक दिली, ज्यामुळे चालक उमेश (३०), त्याचा मुलगा (२) आणि एका सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मुले बुटला दौलतपूर येथील कॅप्टन गजराज सिंह मेमोरियल स्कूलचे विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

6 मुलांना गंभीर अवस्थेत बदायूं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्यांमध्ये स्कूल व्हॅन चालकाच्या मुलाचाही समावेश आहे. बदायूंचे जिल्हा दंडाधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले की, आज सकाळी ९.४५ च्या सुमारास शाळकरी मुलांना घेऊन जाणारी खासगी स्कूल व्हॅन (इको) ट्रकला धडकली.

व्हॅनची प्रथम ट्रकला धडक बसली आणि त्यानंतर मागून येणाऱ्या रोडवेज बसनेही व्हॅनला धडक दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही प्राधान्याने लहान मुलांवर चांगले उपचार करण्यावर भर देत आहोत. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM Transaction Fees : आता ATM मधून पैसे काढणं महागलं! SBI ग्राहकांच्या खिशाला कात्री; व्यवहाराआधी जाणून घ्या नवे शुल्क

Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग २९ मध्ये 'हाय व्होल्टेज' ड्रामा; बडगुजर की शहाणे, कोणाचा होणार राजकीय उदय?

Kolhapur City : सार्वजनिक वाहतूक सक्षम न झाल्यास कोल्हापूर आणखी मागे पडेल; वकिलांचा इशारा आणि ठोस मागण्या

Bigg Boss Marathi 6 : "माझ्यामुळे 50 मुलांना प्रवेश मिळाला" Viral व्हिडीओवर दिव्याचा खुलासा; नेटकरी म्हणाले..

Wani News : आदिमायेचे सुवर्णरूप! सप्तशृंगगडावर अनुभवा निसर्गाचा अद्वितीय सोहळा; सुवर्णकिरणांनी मूर्ती न्हाली

SCROLL FOR NEXT